जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

निळवंडे कालव्यांच्या साईड गटारी करा,अन्यथा आंदोलन-कालवा समिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

 
अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या दुतर्फा गटारीचे काम जलसंपदा आणि महसूल विभाग जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने नगर-नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.सदरचे काम आठ दिवसात सुरू न केल्यास या विभागांच्या विरुध्द निळवंडे कालवा कृती समिती तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी एका निवेदनाद्वारे जलसंपदा विभाग व संगमनेर विभागीय अधिकारी यांना दिला आहे.

“अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्यास कारणीभूत असणाऱ्या अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या साईड गटारी जलसंपदा विभागाने अद्याप पूर्ण केलेल्या नाही त्यांनी महसूल विभाग संगमनेर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे पोलिस संरक्षणाची मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.परिणामी प्रत्येक आवर्तनात अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात आणि पिकात पाणी जात आहे”-रुपेंद्रा काळे,अध्यक्ष निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटले असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचा इशारा दि.१८ जानेवारी २०२३ रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत रुपेंद्र काले व नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) दिला होता.त्यानंतर १३ जुलैला २०२४ आर्थिक अधिकार गोठवले होते.त्यानंतर कालव्यांचे काम जलसंपदा विभागाला डावा कालवा मार्च २०२३ अखेर तर उजवा कालवा हा जून २०२३ अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले होते.आता अस्तरीकरण व वितरण व्यवस्थेचे तांत्रिक काम उशिरा सुरू झाले आहे ही समाधानाची बाब आहे.मात्र शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी जाण्यास कारणीभूत असणाऱ्या अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या साईड गटारी जलसंपदा विभागाने अद्याप पूर्ण केलेल्या नाही त्यांनी महसूल विभाग संगमनेर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे पोलिस संरक्षणाची मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.परिणामी प्रत्येक आवर्तनात अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात आणि पिकात पाणी जात आहे.त्यांचे पहिल्या चाचणीत झालेले नुकसान भरपाई अद्याप जाणीवपूर्वक दिली गेली नाही.मात्र काही शेतकरी व काही राजकीय संघटना आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आंदोलने करून सदर आवर्तनाचे पाणी बंद करण्याची मागणी करतात.शेतीचे नुकसान होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.मात्र अकोले तालुक्यातील कि.मी.०१ ते २८ दरम्यान कालव्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या जलसंपदा विभागाने पूर्ण केलेल्या नाही.त्याबाबत आमच्या संघटनेने या प्रश्र्नी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला असता त्यांनी शेतकरी जलसंपदा विभागाने भुसंपादित केलेल्या जमिनीत शेती करत असल्याचे दिसून आले आहे व ते सदर साईड पट्ट्या करून देण्यास विरोध करत असल्याचे दिसून आले आहे.तर काही राजकीय संघटना निवडणुका पाहून कालव्याचे पाणी बंद करण्याची अनाठायी मागणी करत असून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.त्यामुळे दुष्काळी भागातील १८२ दुष्काळी गावांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे.नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात निळवंडे लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही.परिणामी दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसणार आहेत.त्यामुळे अकोले तालुक्यातील कालव्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.परिणामी दोन्ही साईड गटारीतून पाणी नजीकच्या ओढ्यास जाणार आहे.त्यातून शेतकऱ्यांचे शेतात पाणी जाण्यास मज्जाव होणार असून शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे.मात्र ते करण्यासाठी जलसंपदा विभागाला संगमनेर,नगर रोड येथील महसूल उपविभाग व संगमनेर उपविभागीय पोलिस,अकोले तहसीलदार आदी अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.मात्र सदर दोन्ही विभाग त्याकडे कानाडोळा करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.त्या बाबत जलसंपदा विभागाने त्या त्या विभागाकडे पाठपुरावा केला असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.मात्र त्यांना पोलिस बळ व महसूल विभागाचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.सदरचे कामे तातडीने करणे गरजेचे असल्याने महसूल उपविभाग व पोलिस उपविभाग संगमनेर यांनी पोलिस बळ पुरवून सदरचे काम तातडीने आठ दिवसात मार्गी लावावे अन्यथा समिती संगमनेर विभागीय महसूल कार्यालयावर आंदोलन करील व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित विभागावर राहील असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी दिला आहे.

   सदर प्रसंगी कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू ऊर्हे,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,सह संघटक उत्तमराव जोंधळे,भाऊसाहेब गव्हाणे,साहेबराव गव्हाणे,विजय थोरात,दत्तात्रय थोरात,रमेश गव्हाणे,भिवराज शिंदे,दगडू रहाणे,वाल्मीक नेहे,चंद्रकांत थोरात,जगन्नाथ पाडेकर,तानाजी शिंदे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close