जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावात पुन्हा पाऊल ठेवणार नाही-…यांची प्रतिज्ञा

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण उद्या सकाळी 10 वाजता संपन्न होणार असताना आज अचानक माशी शिकंली असून  सदर कार्यक्रम माजी आ.कोल्हे गटाच्या काही समर्थकांनी हाणून पाडला असल्याचा आरोप झाल्याने,”आपण कोपरगाव शहरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही” अशी भीष्म प्रतिज्ञा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केल्याने शहर आणि तालुक्यात या प्रकरणी टीकेची झोड उठली असून या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

काही वर्षांपूर्वी एका महिलेनं हा लोकार्पण सोहळा होत नाही म्हणून संतप्त होत स्वतः लोकार्पण करून गोंधळ उडवून दिला होता.

  

“राजकारण्यांच्या नादी लागून आमचा झोपडीतील समाजबांधव अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बंदिस्त किती दिवस ठेवणार,सदर विरोधी गटाच्या लोकांनी मंडपवाल्यांना विरोध करून हा कार्यक्रम हाणून पाडला आहे.त्यांनी आगामी काळात असा कार्यक्रम ठेवला तर त्याला तसेच उत्तर मिळू शकते त्यामुळे आगामी काळात आपण व आपले कोणी वंशज कधीही कोपरगाव शहरात येणार नाही”-सचिन साठे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज.

 

गौतम सहकारी बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कार्यकर्ते दिसत आहे.

   कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नियोजन बैठक नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत तत्कालीन तहसीलदार विजय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या एक मताने दि.२६ डिसेंबर 2021 रोजी सकाळी अकरा वाजता पुतळा आणण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर या पुतळ्या बाबत वेळोवेळी मोठे गलिच्छ राजकारण घडले असून अद्यापही ते थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही हे विशेष ! कोपरगाव शहरात सदर पुतळा आणण्यासाठी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे काळात न आणण्यासाठी सदर शिल्पकारावर मोठा दबाव होता.मात्र वहाडणे यांनी संबधित अधिकारी आणि पोलिसांना सज्जड दम भरल्यावर तो आणण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.तो आणला मात्र त्याचे उद्घाटन दि.०६ एप्रिल २०२२ रोजी  राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री राधाकृष्ण विखे,गृहमंत्री दिलीप वळसे,अशा अर्धा डझन मंत्र्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांच्या लोकार्पण व शुभारंभासाठी कोपरगाव येथे आले असता त्यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन केले होते.मात्र यामध्ये काही व्यक्तींनी (ज्यांनी आज केले तीच मंडळी) राजकारण आणून हे अनावरण त्यावेळी होवू दिले नाही.आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होऊ दिली नाही.अनिल जाधव,नितीन साबळे आदींनी सदर उद्घाटनासाठी उपोषण केले असता त्यांना भेट देऊन आ.आशुतोष काळे यांनी त्यांना त्या जागी दिलासा देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांना त्यांच्या हस्ते शासकीय इतमामात अनावरण करण्याचे निमंत्रण दिले होते व नगरपरिषद प्रशासनास त्याचे दिनांक 07 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नियोजन करण्याचे सूचना दिल्या होत्या.त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रमुख उपस्थिती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.आशुतोष काळे हे राहणार होते.याशिवाय खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.राम शिंदे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,आ.किशोर दराडे,सत्याजित तांबे,शिवाजी गर्जे,माजी आ.अशोक काळे,जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आदी उपस्थित राहणार होते.त्यामुळे वास्तविक वाद होण्याचे कारण नव्हते.

  

“आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून आपण गेल्या दिड वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री यांचे हस्ते सदर लोकार्पण करावे अशी मागणी करत आहे.त्याला पालकमंत्री यांनी आश्वासन दिले होते.मात्र या उद्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याशी कोणीही संपर्क साधला नाही;विश्वासात घेतले नाही”-फकिरा चंदनशिव,आंदोलनकर्ते.

तरीही काही विघ्नसंतोषी इसमांनी त्यात काही नेत्यांचे नाव नाही ही सबब पुढे करत त्यास अडथळा आणला असल्याचा आरोप मातंग समाजाचे कार्यकर्ते नितीन साबळे यांनी केला आहे.त्यासाठी आमदारपदी स्नेहलता कोल्हे व आमच्या समाजाच्या माजी अध्यक्ष सुरेखा विनोद राक्षे याअसताना का केला नाही असा आरोप केला आहे. त्यांनी अण्णाभाऊंचे वंशज यांना दूरध्वनी करून या ठिकाणी गोंधळ होणार असल्याची आवई उठवली असल्याचा आरोप करून त्या बाबत ध्वनिफीत पत्रकार परिषदेत पत्रकारांना ऐकवली आहे.त्यात त्यांनी सचिन साठे यांना फोन करून आम्ही काळे गटाचे कार्यकर्ते बोलत असून त्या ठिकाणी लोकार्पण झाले तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.एवढ्यावर ही मंडळी थांबली नाही त्यांनी वारंवार त्यांना फोन करून त्यांना त्रास दिला असल्याचा त्यांचा आरोप आहे.त्यामुळे अण्णाभाऊ यांचे वारस यांनी,”आपण आगामी काळात कधीच कोपरगाव शहरात कधीच येणार नाही ” अशी भीष्म प्रतींज्ञा सचिन साठे यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.त्यासाठी पुरावा म्हणुन ध्वनिफीत ऐकवली आहे.परिणामी त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दूरध्वनी करून आपण सदर कार्यक्रमास येणार नाही असे सांगितले असल्याचे मुख्यमंत्री जगताप यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढून सदर कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे.त्यामुळे आगामी काळात हा पुतळ्याचा लोकार्पण सोहळा खरचं कार्यक्रम होणार का ? प्रत्येक वेळी असाच अकाली शिमगा होणार असा सवाल निर्माण झाला आहे.

“आपण समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला.उद्घाटन होत असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही.मात्र मागील वेळी अचानक कार्यक्रम घेतल्याने विरोध केला होता मात्र आपला उद्याच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नाही पण आपण आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री यांना आणून मोठा कार्यक्रम करणार आहोत.त्यासाठी सचिन साठे यांना अणणार आहे”- विनोद राक्षे,कार्यकर्ते,कोल्हे गट.

   दरम्यान एका माहिती नुसार सदर लोकार्पण सोहळा हा माजी मंत्री कोल्हे यांच्या धर्मपत्नी सिंधुताई कोल्हे यांच्या हस्ते ठेवावा असा काही त्यांच्या समर्थकांचा आग्रह होता अशी माहिती हाती आली आहे त्यातून हे महाभारत घडले असल्याचे समजते.त्याला विनोद राक्षे यांनी दुजोरा दिला आहे.आपला आणि आपल्या वडिल व बागुल आदींनी या पुतळ्यास मोठे योगदान दिले आहे.मात्र कार्यक्रम रद्द करण्याशी त्याचा काही संबंध नाही असे म्हटले आहे.

   दरम्यान काही मूठभर लोकांनी विरोध केला असताना प्रशासनाने हा कार्यक्रम रद्द का केला असा सवाल काही सुज्ञ नागरिकांनी विचारला आहे.सरकार आणि जिल्हाधिकारी बरोबर असताना सदर कार्यक्रम रद्द करण्याची खरच गरज होती का असा सवाल निर्माण झाला आहे.

    दरम्यान आंदोलनकर्ते फकिरा चंदनशिव यांचेशी संपर्क साधला असता त्यानी,”आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून आपण गेल्या दिड वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री यांचे हस्ते सदर लोकार्पण करावे अशी मागणी करत आहे.त्याला पालकमंत्री यांनी आश्वासन दिले होते.मात्र या उद्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याशी कोणीही संपर्क साधला नाही;विश्वासात घेतले नाही” असा आरोप केला आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close