जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

माता रमाई योजनेचा निधी परत,अधिकाऱ्यांची बेपर्वाई उघड !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचवावे आणि त्याचे निवाऱ्यांचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामिण शहरी भागावर त्याच्या स्वत: च्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर पक्के घर बांधण्यासाठी सरकारने,”योजना रमाई घरकुल योजना सन 2009-10 पासून सुरू केली आहे.सदरची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी ग्रामिण विकास यंत्रणा,शहरी विभाग नगर परिषद,नगरपालिका,महानगरपालिका या स्थानिक यंत्रणा चालवत असताना कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मात्र अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईने 02 कोटी 90 लाख 65 हजार रुपयांचा निधी परत गेल्याने संतप्त दलीत कार्यकर्त्यांनी आज कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन,निषेध करून प्रशासनास जाब विचारला आहे.

  

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मात्र सन-2021 पासून प्रशासन राज सुरू असून या काळात मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळत असून शहरातील विविध रस्त्यांचे निधी कागदावर पूर्ण करून काढून घेतल्याचे उघड झाले आहे.या शिवाय वर्तमानात संजय काळे यांनी माता रमाई घरकुल योजनेचा घोळ उघड केला असून यातील 258 लाभार्थ्यांचा बारा वर्षाचा निधी परत गेला असल्याचा आरोप केला आहे.

अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान स्पष्ट व्हावे आणि त्याचे निवाऱ्यांचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामिण शहरी भागावर त्याच्या स्वत: च्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर 269 चौरस फुट पक्के घर बांधून योजना रमाई घरकुल सन 2009-10 पासून सुरू आहे.सदरची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी ग्रामिण विकास शहरी विभाग नगर परिषद,नगरपालिका,महानगरपालिका या स्थानिक यंत्रणा चालवली जाते.कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मात्र सन-2021 पासून प्रशासन राज सुरू असून या काळात मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळत असून शहरातील विविध रस्त्यांचे निधी कागदावर पूर्ण करून काढून घेतल्याचे उघड झाले आहे.या शिवाय वर्तमानात संजय काळे यांनी हा घोळ उघड केला असून यातील 258 लाभार्थ्यांचा बारा वर्षाचा निधी परत गेला असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकांची मोठी फसवणूक झाली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.सदर प्रकरणी चौकशी न झाल्यास आपण आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

  दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एस.टी.एस.टी.आरक्षण वर्गीकरण करण्याबाबत दिलेला निर्णय या आंदोलनकर्त्यानी अयोग्य ठरवला असून या निर्णयाविरुद्ध संवैधानिक पद्धतीने निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लिता सातपुते यांना निवदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.

   सदर प्रसंगी आर.पी.आय.आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिपक गायकवाड,आर.पी.आय.माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय कांबळे,अनिल नन्नवरे,मनोज शिंदे,अमोल थोरात,राकेश वाघ,राजू पगारे,आनंद कोपरे,शुभम भालेराव,आकाश श्रीकांत,संदीप पगारे,प्रफुल्ल शिंगाडे,अकील शेख,शरद खरात,साईनाथ जाधव आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close