जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या संघटनेच्या नेत्यांनी जरांगे यांची घेतली भेट !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली असून त्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत अंतरवलित जावून जोरदार स्वागत केले आहे.याबाबत राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

   

“शेतामध्ये नवनविन प्रयोग शेतकरी राबवत आहेत.परंतू,निसर्गाची साथ मिळत नाही.लाखो रुपये खर्ची करूही उत्पादनावरील खर्चही निघत नाही.परिणामी परिसरातील शेतकरी हे कर्जबाजारी होत आहेत.घरातील इतर सदस्यांचे हातचे काम गेले आहे तर शेती हा नुकसानीचा व्यवसाय ठरत आहे”- अँड.अजित काळे,उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य प्रदेश शेतकरी संघटना.

  जगातील 16% लोकसंख्या असलेला भारत केवळ 2.4% भूसंपत्तीवर टिकून आहे.दोन तृतीयांश लोकसंख्येसाठी कृषी क्षेत्र हे एकमेव उपजीविका आहे जे 57% कामगारांना रोजगार देते आणि मोठ्या संख्येने उद्योगांसाठी कच्च्या मालाचा स्रोत आहे.शेतीला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचे चित्रण असूनही,इतर कोणत्याही उद्योगाच्या तुलनेत कृषी क्षेत्राने सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत.केवळ महाराष्ट्रातील विदर्भातच नाही तर पंजाब,उत्तर प्रदेश,केरळ आणि कर्नाटकातही शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. अनेक चौकशी आयोग स्थापन करण्यात आले आणि विशेषत: पंजाबमध्ये शिफारशी लागू करण्यात आल्या.आत्महत्येची समस्या केवळ भारतातच नोंदवली जात नाही,तर इंग्लंड आणि वेल्ससारख्या जगाच्या विविध भागांमध्येही नोंदवली जाते.1990 च्या दशकात याबाबत भारताला जाग आली होती.आणि शेतकरी समाजातील हा महत्वाचा घटक आत्महत्या करत असल्याचे उघड झाले होते.विदर्भाच्या संदर्भात महाराष्ट्र हे पहिले राज्य ज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या.स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे स्पष्ट होते की व्यावसायिक श्रेणी म्हणून शेतकरी आत्महत्यांच्या उच्च दराच्या या समस्येने त्रस्त आहेत.विदर्भातील अंदाजे ३.४ दशलक्ष कापूस उत्पादक शेतकरी (अकोला,बुलडाणा,वाशीम,अमरावती,नागपूर,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा,यवतमाळ,गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे) व्यापलेले आहेत आणि त्यापैकी ९५% शेतकरी कर्जाशी झुंजत आहेत.या शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवण्याच्या घटना पायाखालची जमीन सर्कविणाऱ्या ठरल्या आहेत.त्यांनी अलीकडेच साथीच्या रोगासारखे राज्यात थैमान घातले आहेत.

     शेती हा बेभरवश्याचा व्यवसाय झाला आहे.कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारातील चढऊतार यामुळे शेतामध्ये केलेला खर्चही पदरी पडत नाही.गेल्या पंधरा दिवसांपासून दर घसरल्याने बाजारात घेऊन जाणेही परवडत नाही.शेतामध्ये नवनविन प्रयोग शेतकरी राबवत आहेत.परंतू,निसर्गाची साथ मिळत नाही.लाखो रुपये खर्ची करूही उत्पादनावरील खर्चही निघत नाही.परिणामी परिसरातील शेतकरी हे कर्जबाजारी होत आहेत.घरातील इतर सदस्यांचे हातचे काम गेले आहे तर शेती हा नुकसानीचा व्यवसाय ठरत आहे.भाजीपाल्याप्रमाणेच गहू,मका,ज्वारी,बाजरी आदी मुख्य पीकांचीही अवस्था तशीच झाली आहे.उडीद,मूग,सोयाबीनलाही अद्यापपर्यंत समाधानकारक दर मिळालेले नाहीत.ऊस पिकाची वेगळी स्थिती नाही.कारखानदार त्यांना आणखी तोट्यात घालत आहे.वर्तमानात पावसामुळे खरीप पीकाचा दर्जाही ढासळलेला आहे.वर्तमानात गत महिनाभर पावसाने दांडी मारल्याने पीक भरविण्याच्या स्थितीत त्याची गोची झाली आहे.जी काही थोडी बहुत पिके आली आहे त्यांना ढगाळ वातावरण कायम असल्याने मोठा मार दिला आहे.हे दृष्ट चक्र संपण्याचे नाव घेत नाही.ऊस पिकाची वेगळी स्थिती नाही.त्यामुळे मनोज जरांगे यांनी शेतकऱ्याप्रती जी संवेदना दाखवली आहे त्याबद्दल शेतकरी संघटनेसह सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी नुकतीच मनोज जरांगे यांच्या अंतरवली या गावी जावून त्यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला आहे.

   दरम्यान त्यांनी जरांगे यांना शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,”मराठा आरक्षण आंदोलनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाणी,चोवीस तास वीज आणि शेतीमालाला रास्त भाव या भूमिकेवर काम करण्याचे ठरविल्याचे प्रसार माध्यमांतून कळाले होते.त्याचे शेतकरी संघटनेला समाधान मिळाले आहे.शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी देशभरात कर्जमुक्तीचे धोरण राबविण्याची गरज आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष,सिफाचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना यासाठी जिकीरीचे प्रयत्न करीत आहे.आता मराठा आरक्षण आंदोलनाने याकामी पुढाकार घेतला आहे.याचे शेतकरी संघटना मनापासून स्वागत आणि अभिनंदन करत असल्याचे ऍड.अजित काळे यांनी शेवटी म्हंटले आहे.

     सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचे सह शिष्टमंडळात औरंगाबाद उच्च न्यायालयाचे ऍड.प्रकाश गायकवाड ऍड.दर्शन पोखरकर या वकिलांसह उपजिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर,प्रभाकर कांबळे,नेवासा तालुका अध्यक्ष अशोक काळे,संजय वमने,सतीश नाईक,भागचंद औताडे,नरेंद्र काळे,बाबासाहेब नागवडे आदींसह किरण लंघे,दत्तू पाटील निकम आदि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close