आंदोलन
नगर जिल्ह्यात विविध मागण्यासाठी…या संघटनेचा मेळावा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला व उत्पादित दुधाला योग्य भाव मिळत नाही,त्यासाठी दूध दर कायदा करावा,शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा आदी मागण्यासाठी नेवासा तालुक्यात शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नेवासा तालुक्यातील करंजगाव येथील समृध्दी मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा,दूध दर कायदा करावा,शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे,तीस हजार लिटर दूध पावडचा बफर स्टॉक करावा,दूध पावडर,तूप,बटर यासारख्या दुग्धजन्य पदार्थ वरचा जीएसटी पूर्णपणे रद्द करावा आणि पुढील तीन महिन्यांसाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावी या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी सर्व प्रथम श्रीरामपूर तालुक्यात ‘रास्ता रोको आंदोलन’ करून राज्याचे लक्ष वधून घेतले होते.त्यानंतर राज्यातील अन्य शेतकरी संघटनांना जाग आली होती.त्यानंतर श्रीरामपूर येथील दूध संघाला शासन मान्य दर द्यायला भाग पाडले होते.त्यानंतर आता पुढील टप्पा सुरू होत आहे.त्यासाठी त्यांनी नेवासा तालुक्यात करंजगाव येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ”शेतकरी मेळावा ” आयोजित करण्याची घोषणा केली आहे.त्यासाठी त्यांची तयारी जोरात सुरू आहे.त्यासाठी त्यांनी एक प्रसिध्दी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात ही माहिती दिली आहे.
दरम्यान या मेळाव्यास राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर,युवा आघाडी प्रमुख डॉ.रोहित कुलकर्णी,नरेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की,”शेतकऱ्यांना वर्तमानात कोणी वाली राहिला नाही.त्यांच्या शेत मालाला भाव मिळत नाही.त्यांना डॉ.स्वामिनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे शेतमालाला भाव मिळत नाही.दूध भावाला भिक मागावी लागत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील पशू संवर्धन मंत्री असताना ही दुर्दैवी स्थिती आहे.त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक काळे यांनी केले आहे.