जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

मराठा आरक्षण जनजागृती अभियान,कोणाला फटका बसणार ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
राज्यातील मराठा समाजाला अद्यापही मराठा आरक्षण मिळाले नाही असा आरोप करून कोपरगाव तालुक्यात काल पासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करून जनजागृतीस प्रारंभ केला असल्याची माहिती अड्. योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे या मोहिमेचा फटका कोणाला बसणार याची जोरदार चर्चा तालुक्यात व शिर्डी मतदार संघात सुरु झाली आहे.

 

दरम्यान आज शनिवार दि.२७ एप्रिल रोजी पुणतांबा फाटा,डाऊच,घारी,चांदेकसारे,सोनेवाडी,वेस-सोयगाव,मल्हारवाडी,काकडी,मनेगाव,रांजणगाव देशमुख,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,घोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर, सह पोहेगाव आदी ठिकाणी बैठका व सभा घेण्यात आल्या असून त्यास मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची बातमी आहे.

 

  महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी २६ फेब्रुवारी पासून करण्यात आली असल्याची घोषणा सरकारने केली आहे.शासनाने तसा आदेश काढला असून अंमलबजावणीबद्दलच्या तरतुदी सांगितल्या आहेत.महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ नुसार ‘सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग’ निर्माण करण्यात आला आहे.त्यानुसार या वर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्यात आलं असल्याची राणा भीमदेवी घोषणा केली असली तरी मराठा समाज त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही.त्याबाबत दिवसेदिवस अस्वस्थता वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.त्यातून लोकसभेच्या दोन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या असून आता तिसरा टप्पा पार पडत असून त्यात शिर्डी,दक्षिण नगरचा समावेश आहे.या निवडणूका आगामी १३ मे रोजीस संपन्न होत आहे.मात्र मराठा समाजाची अस्वस्थता आता बाहेर पडू लागली असून त्याचे प्रत्यन्तर आता दिसून येत आहे.या बाबत मराठा समाजाची नुकतीच एक बैठक कोपरगाव येथे संपन्न होऊन त्यांनी या बैठकीत शिर्डी लोकसभा मतदार संघातील कोपरगाव शहर आणि तालुक्यात या बाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी अमंलबजावणी सुरु केली आहे.त्यासाठी काल कोपरगाव  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकास अभिवादन करून  त्याची अमलबजावणी सुरु केली आहे.

   सदर प्रसंगी पी.डी.आहेर,अड्.रमेश गव्हाणे आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

  दरम्यान आज शनिवार दि.२७ एप्रिल रोजी पुणतांबा फाटा,डाऊच,घारी,चांदेकसारे,सोनेवाडी,वेस-सोयगाव,मल्हारवाडी,काकडी,मनेगाव,रांजणगाव देशमुख,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,घोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर, सह पोहेगाव आदी ठिकाणी बैठका व सभा घेण्यात आल्या आहेत.तर आगामी काळात देर्डे कोऱ्हाळे,मढी,कोळगाव पाटी,वेळापूर,मोर्विस,मंजूर,टाकळी,ब्राम्हणगाव,धामोरी,मायगाव देवी आदी ठिकाणी सभा संपन्न होणार आहे.
  
  दरम्यान या प्रमाणे तालुक्यातील सर्व गावात आगामी काळात दि.०३ मे पर्यंत हा दौरा संपन्न होणार आहे.त्यासाठी मराठा समाजातील कार्यकार्त्यानी सहकार्य करावे ससे आवाहन बाळासाहेब जाधव यांनी शेवटी केले आहे.त्यासाठी मराठा समाजातील तरुणांचा मोठा सहभाग लाभत असल्याचे  त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close