आंदोलन
भिडे गुरुंजीवर हल्ला,कोपरगावात निषेध !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अनेक युवकांचे मार्गदर्शक असलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यांचा मास्टर माईंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी कोपरगाव येथील हिंदू जनजागृती समितीने नुकतीच कोपरगाव तहसीलदार यांचेकडे केली आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,”संभाजी भिडे गुरुजी म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व मानले जात असून महाराष्ट्र,कर्नाटक या दोन्ही राज्यातील अनेक युवकांना दिशा देऊन देव देश व धर्म यांच्या रक्षणासाठी कृतिशील केलेले आहे.त्यांनी केलेल्या प्रेरणेमुळे अनेक युवक राष्ट्रधर्म रक्षणासाठी कृतीशील झालेले आहेत,तसेच व्यसनांपासून दूर झालेले आहेत. त्यामुळे संभाजी भिडे गुरुजी हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहेतअसे असताना गुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा त्यांना त्रास देण्याचा त्यांच्या गाड्या अडवण्याचा निषेधार्थ प्रकार होत आहे. मनमाड (जिल्हा नाशिक) येथे २९ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.स्वतःला आंबेडकरवादी म्हणणार्या काही माथेफिरूंनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला.या वेळेस आक्रमण करताना गाडी अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली,पायातील बूट व अन्य तत्सम वस्तूंचा उपयोग करून गाडीच्या काचा फोडण्याचा गंभीर प्रकार केला.पूजनीय गुरुजींसारख्या व्यक्तिमत्त्वावर तसेच वयोवृद्ध व्यक्तीवर अशा प्रकारचा भ्याड हल्ला हे निषेधार्ह असून या संदर्भातील निवेदन कोपरगांव येथे कोपरगांव येथील नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते व पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनाच्या माध्यमातून,”या घटनेमागे जे दोषी आहेत त्यांना पकडून त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. यांचे मास्टरमाईंड शोधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा त पूर्वनियोजित कट,तर नाही ना ? याची चौकशी करावी संभाजी भिडे गुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सर्वश्री व धारकरी,दत्तात्रय भागिले,सूरज रायते,बबन शिरसाठ,विजय गायकवाड,शुभम शेरे,आकाश चिटणीस,ओंकार साईनाथ येवले,मनोज मुळेकर,राहुल गिरमे,आकाश चांदर
तुषार जाधव,दिलीप सारंगधर
देवेंद्र पंडोरे,भारत गायकवाड शुभम इंदरखे,पंडू गुंजाळ हे उपस्थित असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रदीप देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.