आंदोलन
‘ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट’ लागू करण्यासाठी करणार प्रयत्न-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून केलेली हत्या निषेधार्थ असून वकील बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच दिले आहे.
“दरम्यान राहुरी येथील वकील संघाच्या साखळी उपोषणास आमचा पाठींबा सुरु असून या साखळी उपोषण जिल्ह्यातील १३ तालुक्यातील निर्णयानुसार सुरु ठेवायचे की,’वकील संरक्षण कायदा’ संमत होई पर्यंत थांबायचे याचा निर्णय उद्या दि.०५ फेब्रुवारी रोजी कोपरगाव वकील संघ घेणार आहे”-अड्.एम.पी.येवले,अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.
राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांची हत्या ही खंडणीसाठी झाल्याचे तपासात समोर आले असल्याने राज्यातील वकीलही सुरक्षित नसल्याचे समोर आले असून अ.नगर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांसह पाच जणांची नावे समोर आली आहेत. यातील चाैघांना अटक करण्यात आली असली तरी त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहे.कोपरगाव वकील संघाने राज्यातील वकिलांना संरक्षण कायदा मंजूर करावा यासाठी तीन दिवस कामबंद करून साखळी उपोषण सुरु केले असल्याचे दिसून आले आहे.त्या ठिकाणी आज आ.आशुतोष काळे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राहुरीच्या वकील वकील दाम्पत्याची करण्यात आलेली निर्घृण हत्या ह्या घटनेचा केवळ निषेध करून चालणार नाही तर अशा प्रवृत्तींना कायमचा धडा शिकवून भविष्यात वकील बांधवांच्या बाबतीत अशा घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.त्याबाबत शासनदरबारी निश्चितपणे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.न्याय मंदिरात नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची करण्यात आली हत्या अत्यंत दुर्देवी असून माझा देखील वकिल बांधवांच्या साखळी उपोषणाला पाठींबा असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी कोपरगाव न्यायालयातील वकील संघाचे अध्यक्ष अड्.एम.पी.येवले,उपाध्यक्ष,सचिव,वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,अड्.शिरीष कुमार लोहकणे,अड्.अतिष आगवन,अड्,डी.व्ही.देवकर,योगेश खालकर,अड्.ए.एस.काकड,अड्.एम.यू.शेख,अड्.एम.एस.भिडे,आदी सदस्य उपस्थित होते.