आंदोलन
वकील संघाचे…या शहरातही आंदोलन सुरु !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांची हत्येचे पडसाद कोपरगावात उमटले असून तीन दिवसापासून कोपरगाव वकील संघाने कामबंद आंदोलन करून साखळी उपोषण सुरु केले असून त्यांनी वकील संरक्षण कायदा मंजूर करावा अशी प्रमुख मागणी केंद्र व राज्य सरकार कडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांची हत्या ही खंडणीसाठी झाल्याचे तपासात समोर आले असल्याने राज्यातील वकीलही सुरक्षित नसल्याचे समोर आले असून अ.नगर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांसह पाच जणांची नावे समोर आली आहेत. यातील चाैघांना अटक करण्यात आली असली तरी त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहे.कोपरगाव वकील संघाने राज्यातील वकिलांना संरक्षण कायदा मंजूर करावा यासाठी तीन दिवस कामबंद करून साखळी उपोषण सुरु केले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे राज्यातील संतापलेल्या वकिलांना राज्य सरकार कसे शांत करणार याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.यातील प्रमुख आरोपी किरण दुशिंग याने आपल्या साथीदारांच्या मदतीने कट करून राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याला खटल्याच्या कामकाजासाठी बोलावून घेतले.यानंतर दुशिंग याने स्वत:च्या गाडीत बसवून घेऊन आढाव दाम्पत्याला त्यांच्याच घरी घेऊन गेले.तेथे दोघांचे हात-पाय बांधून ठेवले.पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. परंतु आढाव दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला.यातून आरोपींनी आढाव यांचा त्यांच्याच घरामध्ये पाच ते सहा तास छळ केला होता.यानंतर आढाव दाम्पत्याला कारमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर घेऊन गेले.रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांना मारण्यात आले होते.आढाव दाम्पत्याचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले.यानंतर वकील आढाव दाम्पत्याची कार राहुरी न्यायालय परिसरात लावली होती त्यानंतर हा गुन्हा उघड झाला होता.त्यानंतर कोपरगावसह राज्यभर खळबळ उडाली होती.
दरम्यान या घटनेचे पडसाद कोपरगावात उमटले असून वकील संघाने दि.२९ जानेवारी पासून आपले कामकाज बंद ठेवले असून साखळी उपोषण सुरु केले असून यात सदरचा गुन्हा जलद न्यायालयात चालविण्यात यावा व वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा (ऍडव्होकेट प्रॉटेक्शन ऍक्ट) मंजूर करावा अशी प्रमुख मागणी केली आहे.निवेदनाच्या प्रति राज्याच्या विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह कोपरगावचे आ.आशुतोष काळे आदींना दिलेल्या आहेत.
सदर प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अड्.मनोहर येवले,उपाध्यक्ष शरद गव्हाणे,महिला उपाध्यक्ष ज्योती भुसे,माजी अध्यक्ष जयंत जोशी,मच्छीन्द्र खिलारी,शंतनू धोर्डे,दिलीप लासुरे,व्ही.पी.ख्रिस्ते,अड्.पानगव्हाणे,अड्.एस.एम.वाघ,सचिव दिपक पवार,योगेश खालकर,नितीन पोळ,वसंत कपिले,अड्.बाबासाहेब सोनवणे,एस.एम.सांगळे,नरेंद्र संचेती,एम.एस.भिडे,अड्.योगेश दाभाडे,उत्तम पाईक,सुयोग जगताप,अड्.प्रदीप रणधीर,अड्.गुजर,अड्.काकड,विजय गवांदे,एस.बी.शेख,एस.एस.शेख,अड्.मगर आदिसंह बहुसंख्य वकील उपस्थित होते.