जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’ मागणीसाठी अखेर आंदोलन सुरु !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राज्यात गाजलेल्या कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान गट क्रमांक,४४७ व ४४८ मधील अतिक्रमण हटविण्याबाबत चुकीचा अट्टहास करणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी वरिष्ठ महसुली कार्यालयांना चुकीचे अहवाल पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कृतीच्या विरुद्ध व तेथील ग्रामस्थांना भरपाई मिळावी यासाठी तेथील कार्यकर्ते नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी आज पासून धोंडेवाडी येथे आपले,”आमरण उपोषण” सुरु केले आहे.त्यामुळे सरकार आता काय भुमीका घेणार या कडे ग्रामस्थांसह कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

  

सदर प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी या प्रकरणी,”वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात तोपर्यंत सदर उपोषण स्थगित करावे” अशी लेखी विनंती आंदोलनकर्ते नानासाहेब नेहे यांना केली होती.मात्र त्यांनी ती फेटाळली आहे व आपले उपोषण आज गुरुवार दि.११ जानेवारी सकाळी ११.३० वाजता सुरु केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण अठरा तर शिर्डी पासून पश्चिमेस अवघ्या १० कि.मी.अंतरावर जवळके ग्रामपंचायत हद्दी जवळच धोंडेवाडी हि ग्रामपंचायत सन १९८० साली स्थापन झाली होती.त्यात दोन गटात काही वर्षापासून पाझर तलावातील विहिर बुजविण्यावरून वाद निर्माण झाले होते.त्यावरून हे प्रकरण तापून थेट गावठाण नजीक असलेल्या गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्यावर गेले होते.त्यात महसुली अधिकाऱ्यांनी गावठाण विस्तार  योजनेत समाविष्ट करण्यासाठी नजीक सरकारी जमीन आहे का ? अशी विचारणा स्थानिक महसुली कर्मचाऱ्यांना सदर अतिक्रमण काढण्यापूर्वी केली होती.मात्र त्यांनी याबाबत अशी जमीन उपलब्ध असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना जमीन उपलब्ध नसल्याचे चुकीचे अहवाल दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अतिक्रमण पाडून टाकले होते.

   मात्र सदर प्रकरणी तेथील कार्यकर्ते नानासाहेब नेहे यांनी माहिती अधिकारात माहिती मिळवली असता त्यात अशी  जमीन धोंडेवाडी येथे उपलब्ध असल्याचे पुरावे दिले आहे.त्यामुळे त्यांनी हे प्रकरण पुन्हा एकदा तापवले असून यास सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.व त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मदत व पुनर्वसन मंत्री,जिल्हाधिकारी आदींना निवेदन देऊन सदर प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.व उपोषणाचा इशारा दिला होता.व त्यानुसार आज पासून आपले हनुमान मंदिर धोंडेवाडी येथे आपले,’आमरण उपोषण’ सुरु केले आहे.

   दरम्यान सदर प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी या प्रकरणी,”वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात तोपर्यंत सदर उपोषण स्थगित करावे” अशी लेखी विनंती आंदोलनकर्ते नानासाहेब नेहे यांना केली होती.मात्र त्यांनी ती फेटाळली आहे व आपले उपोषण आज गुरुवार दि.११ जानेवारी सकाळी ११.३० वाजता सुरु केले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close