जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

विविध संघटनाच्या वतीने आंदोलन,सत्ताधारी खडबडून जागे !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले यांच्या मार्गदर्शनात आणि  प्रहार चे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांचे नेतृत्वात श्रीरामपूर- संगमनेर महामार्गावर दत्तनगर पोलीस चौकी समोर वाकडी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या मागणी साठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.त्यावेळी ग्रामस्थानीं मोठा प्रतिसाद दिला असून त्यामुळे श्रीरामपूर,राहाता,कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नेते झोपेतून जागे झाले असून त्यांनी त्याची दखल घेतली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे ग्रामस्थानीं समाधान व्यक्त केले आहे.

‘रास्ता रोको’ प्रसंगी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे दिसत आहे.

  

“गणेशनगर मार्गे श्रीरामपूर या रस्त्या बाबत प्रशासनाच्या जिल्हा परिषद,जिल्हाधिकारी आदींच्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केलेला असून तीनही तालुक्यातला एकही लोकप्रतिनिधीया रस्त्याच्या विकासासाठी सरसावलेला दिसून आलेला नाही”-अभिजित पोटे,जिल्हाध्यक्ष,प्रहार संघटना.

तीर्थंक्षेत्र शनी-शिंगणापुरसाठी जवळचा ठरणारा व वेळ व पैसा वाचविणारा शिर्डी-शनी शिंगणापूर या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत असून अनेकांची जीवित व वित्तीय हानी होत असल्याने व त्याकडे लक्ष वेधूनही सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती व जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने दि.०४ जानेवारी रोजी सकाळी ११  वाजता दत्तनगर फाटा येथील पोलीस चौकी समोर प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक रुपेंद्र काले यांच्या प्रमुख उपस्थितीत ,’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

‘रास्ता रोको’ प्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे संघटक रुपेंद्र काले दिसत आहे.

“राहाता,श्रीरामपूर,कोपरगाव आदी तीनही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या रस्ते कामाच्या दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्ती संताप आणणारी असून त्यांना सामान्यांच्या जीवाशी कोणतेही देणे घेणे नाही; स्वतःच्या संस्था आणि स्वार्थासाठी नेते मंडळी एकत्र येतात मात्र समाज हितासाठी मात्र मौन पाळत आहे”-रुपेंद्र काले,संघटक शेतकरी संघटना,अ.नगर जिल्हा.

   सदर प्रसंगी राहाता,कोपरगाव,श्रीरामपूर आदी तीनही विधानसभा सदस्यांचे प्रतिनिधी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता हजर होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

   श्रीरामपूर,राहाता तसेच कोपरगाव या तीनही मतदार संघाच्या हद्दी मधून जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शिर्डी येथे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला तसेच या तीनही तालुक्यातील नागरिकांना व इतर प्रवाशांना दैनंदिन ये जा करण्यासाठी तसेच श्रीक्षेत्र शिर्डी ते शनी शिंगणापूर धार्मिक जोडणारा मुख्य मार्ग म्हणजेच श्रीरामपूर ते वाकडी गणेश नगर मार्गे शिर्डी रस्ता हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय सूडबुद्धीने व जाणीवपूर्वक गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवलेला असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे या रस्त्याने सर्वसामान्यांसह दिव्यांग नोकरवर्ग साई भक्त शनि भक्त यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांना चालवताना अत्यंत मोठी कसरत करावी लागते त्यामुळे अनेक वेळा या रस्त्यावर मोठमोठे अपघात होऊन अनेकांना जीवही गमवा लागलेला आहे.मात्र राजकीय पोटी या रस्त्याचा विकास होत नसल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने अ.नगर जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वात व शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले यांच्या मार्गदर्शनात झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी नुकताच श्रीरामपूर संगमनेर रोडवरील पोलीस चौकी समोरील वाकडी फाटा येथे सकाळी ११ वाजल्यापासून दोन तास भव्य रास्ता रोको करण्यात आला आहे.

   सदर प्रसंगी श्रीरामपूर प्रहार विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस,प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, वाहतूक जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे,विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप,प्रहारचे पांडुरंग औताडे,श्रमिक सेवा संघाचे बाळासाहेब कराळे, श्रीरामपूर शहर प्रमुख सोमनाथ गरजे,देवळाली शहर प्रमुख प्रकाश वाकळे,राहाता युवक अध्यक्ष विजय काकडे, उपाध्यक्ष बाबासाहेब दिवे,उपप्रमुख राहुरी गणेश भालके,जमील शेख,विजय सोनवणे,अशोक लोंढे,आधार दिव्यांग संघटनेचे भारत चौधरी,राम दामाळे,मनोज धनवटे,शेतकरी संघटनेचे युवराज जगताप,नानासाहेब गाढवे,विठ्ठल शेळके,व्यापारी संघटनेचे डॉक्टर संपत शेळके,वाकडी सरपंच रोहिणी आहेर आदींसह वाकडी परिसरातील शेतकरी नागरिक आपली नियमित दुकाने व कामे बंद ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सदर प्रसंगी बोलताना अभिजित पोटे म्हणाले की,”या रस्त्या बाबत प्रशासनाच्या जिल्हा परिषद,जिल्हाधिकारी आदींच्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केलेला असून तीनही तालुक्यातला एकही लोकप्रतिनिधीया रस्त्याच्या विकासासाठी सरसावलेला दिसून आलेला नाही असा आरोप केला आहे.जो तो प्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील कामे करण्यात व्यस्त असल्याने या रस्त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.यावेळी पालकमंत्र्यांच्या वतीने एका कार्यकर्त्यांनी आपले कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे व कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रवृत्तीस विरोध केला आहे.निवडणुका आल्यावर बोलणाऱ्या व पोपट पांची करणाऱ्या प्रवृत्तीचा समाचार घेतला व कृती बाबत आग्रह केला आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे रूपेंद्र काले यांनी,”तीनही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या रस्ते कामाच्या दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीवर संताप व्यक्त केला सर्व सामान्यांच्या जीवाशी कोणालाही कोणतीही देणे घेणे नसल्याचा आरोप केला आहे.व स्वतःच्या संस्था आणि स्वार्थासाठी नेते मंडळी एकत्र येतात मात्र समाज हितासाठी मात्र मौन पाळत असल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close