आंदोलन
…या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनास वाढता पाठींबा !

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(वार्ताहर)
कोपरगावात मराठा समाज आंदोलनास वाढता पाठींबा
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे सकल मराठी समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषण करण्यात आले असून त्यास चांगला पाठींबा मिळत आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण दि.२५ ऑक्टोबर पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.त्याला माहेगाव देशमुख येथील मराठा समाजाने पाठींबा दिला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण दि.२५ ऑक्टोबर पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे साखळी उपोषण केले जात असून त्यास अनेक ग्रामस्थानीं घटनास्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
गावातील सर्व मराठा समाज एकत्र येऊन साखळी उपोषणाला पाठिंबा देत आहे त्या वेळी सरपंच सुमनबाई ज्ञानेश्वर रोकडे,उपसरपंच भास्कर किसनराव काळे,ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके,माहेगाव देशमुख येथील सर्व मराठी समाजातील तरुण आदींनी सहभाग दर्शवला आहे.