जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

अखेर बहुचर्चित कांदा अनुदान मिळण्यास सुरुवात…!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जानेवारी ते मार्च २०२३ घरच्या दरम्यान कांद्याचे बाजार भाव कोसळलेले असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा व काही अंशी कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान भरून निघावे याकरिता सरकारने शेतकऱ्यांना ०१ मार्च  ते ३१ मार्च  दरम्यान बाजार समितीमध्ये विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये दर २०० क्विंटलच्या मर्यादेपर्यंत देण्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान घोषित केले होते व त्या संदर्भातला शासन आदेश काढण्यात आला होता.सदर अनुदान मिळण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती कोपरगाव तालुका संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यानी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने ऑगस्टमध्ये शासन निर्णय काढून कांदा अनुदानाची रक्कम वितरित करण्याची तरतूद करून आज दि.०८ सप्टेंबर पासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कांदा अनुदानाची रक्कम कुठलीही निकष अटी न लावता इ.के.वाय.सी.न करता जमा  करण्यास सुरुवात केली आहे.याबद्दल कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्च महिन्यात प्रति क्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केलं होतं मात्र निधीच्या कमतरतेमुळे एक आदेश काढून त्यात कांद्याचा ई-पीक पेरा असण्याची अट व हाताने लिहिलेल्या सातबारा उताऱ्याला प्रतिबंध करून व ‘लेट खरीप’ हा नवीन प्रकार शोधून काढून शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवण्याचा डाव टाकल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली होती त्या विरोधात शेतकरी संघटना व कोपरगाव तालुका संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता त्याची दखल राज्याच्या पणन विभागाने घेतली असून सदर अट रद्द केली होती.

दरम्यान त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन पावसाळी अधिवेशन दरम्यान सर्व अटी व निकष शिथिल करून सरसकट कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.वर्तमानात महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ असल्यामुळे व खरिपाचे संपूर्ण पिके वाया गेल्यामुळे तसेच गेल्या वर्षीची अतिवृष्टीचे अनुदानाचे पैसे अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे.याची जाणीव वारंवार प्रशासनाला तसेच राज्य सरकारला कृती समितीच्या वतीने विविध आंदोलनाच्या करून देण्यात आली होती.

         महाराष्ट्र शासनाने ऑगस्टमध्ये शासन निर्णय काढून कांदा अनुदानाची रक्कम वितरित करण्याची तरतूद करून आज दि.०८ सप्टेंबर पासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कांदा अनुदानाची रक्कम कुठलीही निकष अटी न लावता इ.के.वाय.सी.न करता जमा  करण्यास सुरुवात केली आहे.याबद्दल कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहे.दरम्यान जी रक्कम शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीसाठी पात्र असलेली किंवा त्याला मंजूर झालेल्या रकमेपैकी फक्त १०,००० रू.पर्यंतची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असे दिसते. १०,००० रू.च्या पर्यंत च्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण मदत रक्कम वितरित झाल्याचे समजले आहे तसेच १०,००० रू. च्या पुढील सर्व शेतकऱ्यांना पहिला टप्पा जास्तीत जास्त १०,००० रू. प्रमाणे वितरित झाला आहे.उर्वरित रक्कम अद्यापही जमा झालेली नाही कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने शासनास केली आहे की,”उर्वरित सर्व पात्र अनुदानित रक्कम लवकरात लवकर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी केली असून त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याचे आवाहन कोपरगाव तालुका शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते तुषार चारुचंद्र विद्वांस,प्रविण आपासाहेब शिंदे,पद्माकांत शंकरराव कुदळे,संतोष कांतीलाल गंगवाल,नितीन मनोहर शिंदे,अनिल शेवते,नरेंद्र गिरमे,सदाशिव (बाबा) रासकर आदींनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close