आंदोलन
खरीप अडचणीत,संतप्त शेतकऱ्यांनी कालव्याचे गेट तोडले !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात ऊसासह खरीप पीक क्षेत्र ५० हजार ७८६ हेक्टर असून एकूण लागवडीखाली टक्केवारी ९७.५ टक्के झाली असली तरी पावसाअभावी गोदावरी कालव्यांखालील हे सर्व पिके धोक्यात आली असल्याने शेतकऱ्यांनीं संताप व्यक्त केला असून आज त्यांची सहनशीलता संपली असल्याचे दिसून आली असून आज टाकळी हद्दीतील शेतकऱ्यांनी चारी सोडण्यासाठी आज आंदोलन करून दुपारी ४.३० वाजता तेथील गेट तोडून टाकले आहे.त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर मोठा संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान या प्रश्नी कोपरंगाव शहर पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्या प्रश्नी आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून त्यात जलसंपदा विभागाचे कुलूप तोडून ४२७ रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दाखवले असल्याचे माहिती हाती आली आहे.मात्र त्या प्रकरणी शहर पोलीस आता काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.यापूर्वी वाकडी येथील उजव्या कालव्याचे गेट तोडल्या प्रकरणी तेथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.
अ.नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे.सुरूवातीला जून महिन्यात पावसाने अवकृपा केली.जुलैमध्ये पेरणीसाठी पाऊस झाला तेवढया पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली त्यानंतर मात्र तो गायब झाला.त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले.बहुतांशी हवामान तज्ज्ञ पावसाने उताणे केले आहे.मधील काळात पावसाचा मोठा पडलेला खंड खरीप पिकांच्या मुळावर आला आहे.अ.नगर जिल्ह्यात सुमारे सरासरी क्षेत्र ०५ लाख ७९ हजार ७६८ हे.असून त्यातील ०४ लाख ८५ हजार ०६९ क्षेत्रावर पेरणी झाली असून सरासरी ती ८४ टक्के असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हे खरीप क्षेत्र ऐन पीक वाढीच्या अवस्थेत पावसाने खंड दिल्याने अडचणीत आले असून सोयाबीन पिकाने मान टाकली आहे.सोयाबीन,मका,बाजरी,कपाशी आदी पिके पावसापाण्याअभावी सुकली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनीं आज टाकळी हद्दीत येथील डाव्या कालव्यावरील सात चारी तातडीने सोडावी यासाठी आज सकाळी १०.३० वाजता तेथील गेटवर आंदोलन केले व जलसंपदा विभागाच्या विरुद्ध घोषणा देत या ठिकाणच्या गेट तोडुन टाकले असल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केवळ हात चोळत बसण्याशिवाय काही काही करता आले नाही.
जलसंपदा कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता श्री निकम यांनी सहा दिवसाचे आधी पाणी देता येणार नाही अशी भूमिका घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे.
“गोदावरी खोरे हे पर्जन्य छायेतील असून त्यासाठी इंग्रज सरकारने दारणा धरण बांधले होते.मात्र आज पर्जन्य छायेतील प्रदेश सोडून आज आठ माही असलेले जायकवाडी धरणात आठ माही ऐवजी बारमाही पाणी दिले जात आहे.हे विरोधाभासी चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे आज खरीप पिकांची वाट लागली आहे.गोदावरी डावा कालव्यातून पाणी डोळ्यादेखत वाहत असताना खरीप पिके मात्र सुकून चालली आहे”-पद्मकांत कुदळे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
दरम्यान या प्रश्नी कोपरंगवस शहर पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्या प्रश्नी आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून त्यात जलसंपदा विभागाचे कुलूप तोडून ४२७ रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दाखवले असल्याचे माहिती हाती आली आहे.मात्र त्या प्रकरणी शहर पोलीस आता काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे,कोपरगाव तालुका शेतकरी समितीचे तुषार विध्वंस,प्रवीण शिंदे,अनिल गायकवाड,विजय जाधव,मनीष देवकर,बाळासाहेब देवकर,ब्राम्हणगाव परिसरातील शेतकरी व टाकळी येथील सरपंच संदीप देवकर,शशिकांत देवकर,वीजय जाधव,श्री उगले,मयूर देवकर,गणेश देवकर आदी प्रमुख मान्यवरांसह अनेक बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.