जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव तालुक्यात अत्याचार,अवैध कार्य करणाऱ्या मदरशावर बुलडोजर चालवा-चव्हाणके

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


कोपरगाव तालुक्यात अत्याचार अवैध कार्य करणाऱ्या मदरशावर बुलडोजर चालवा-सुरेश चव्हाणके कोपरगाव आणि तालुक्यात अवैध कार्य करणाऱ्या मदरशावर बुलडोजर चालवावा व शहरातील मस्जिदिवरील भोंगे त्वरित बंद करावे अन्यथा आम्ही त्यांच्या समोर आम्ही हिंदू घरांवर दुसरे भोंगे लावू असा इशारा सुदर्शन वाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी सागर बेग यांनी मार्गदर्शन करताना
कोपरगाव शहरातील पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यास काही तासात त्यास अटक केल्याने बेग यांनी शहर पोलिसांचे कौतुक करताना त्यांनी या प्रकरणात
हिंदू मुलगा मदत करण्यास गेला असता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी त्यास मारहाण केली असल्याचा गंभीर आरोप करून आरोपीस पोलिसांनी भ्रमन ध्वनी सेवा पुरवली असल्याचा आरोप केला आहे.


कोपरगाव शहरात लव्ह जिहादच्या प्रकार उघड झाला असून हिंदू संघटना खडबडून जाग्या झाल्या असल्याचे दिसून येत असून त्यांनी आज गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सुमारे दीड लाख नागरिक,महिला जमून,’हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

हिंदू जनाक्रोश प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील साधुसंत बहुसंख्येने उपस्थित होते त्याचे छायाचित्र.

दरम्यान या हिंदू जनक्रोश मोर्चासाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक,एक अप्पर पोलीस अधीक्षक,०५ उपविभागीय पोलीस अधिकारी,१७ पोलीस निरीक्षक,३८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक,राखीव पोलीस दलाच्या ०६ प्लाटून,३२६ पोलीस अंमलदार,राखीव पोलीस दलाच्या ०३ प्लाटून,५० महिला राखीव पोलीस आदींनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

सदर प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,सागर बेग,अर्चना ठाकूर,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी आ.कोल्हे,आ.आशुतोष काळे यांच्या मातोश्री पुष्पांताई काळे,सेनेचे शहर प्रमुख सनी वाघ आदींसह सुमारे दीड लाख नागरिक महिला उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव येथील महाविद्यालयातील विद्यार्थी आहे.हे अभिमानाने सांगतो.संजीवनी विद्या निर्माण करणारे हे ठिकाण आहे.पूर्व आणि पश्चिमेस लक्ष दिले नाही म्हणून पाकिस्तान व बांगलादेश निर्माण झाले ते टाळायचे असेल तर हिंदू पेटून उठला पाहिजे.पूर्वी आमचे हिंदू शूर असल्याने आज आम्ही ताट मानाने हिंदू म्हणून जगत आहे.
महाराष्ट्रातील हिंदू जागा झाला तर सर्व देशातील हिंदू जागा होईल असा दावा केला आहे.बरेच नागरिक इज्जतीसाठी अन्याय सहन करतात.मात्र आता पेटून उठावे लागेल.जिजाऊ उद्यान,सुभाषनगर,अंबिकानगर आदी ठिकाणे काबीज होत आहे.कोपरगावात अंबिकानगर येथे अवैध मस्जिद उभी राहात आहे.ती त्वरित हटवा अन्यथा आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल.कोपरगाव शहरात मालेगाव, भिवंडी येथून मुस्लिम आणले आहे.कमी की काय बांग्लादेशी सुद्धा आणले आहे.पण हे थांबवावे लागेल असे आवाहन केले आहे.ज्या मदरशात मुलीवर अत्याचार झाला ती मस्जित उभी कशी?असा सवाल करून त्यांनी आम्हाला तसे सरकार आणावे लागेल.मध्यप्रदेशात तीस दिवसात न्याय द्यावा लागेल.लव जिहाद विरोधी जलद न्यायालय आणावे लागेल त्यासाठी राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.अवैध कार्य करणाऱ्या मदरशावर बुलडोजर चालवावा लागेल.अनेक व्यवसाय मुस्लिमांनी काबीज केले आहे त्यामुळे स्थानिक उपेक्षित झाले आहे.मोबाईल दुकाने काबीज करून जिहादी हिंदू मुलींना फितवत आहे.हिंदू मुलींनी ज्या आईने त्यांना नऊ महिने पोटात ठेवले त्यांच्यावर प्रेम करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

सदर आंदोलन प्रसंगी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला आहे त्याचे छायाचित्र.

सदर प्रसंगी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील अग्रणी असलेल्या समता सहकारी पतसंस्थेने आलेल्या नागरिकांना नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खरा काशीविश्वनाथ ज्ञानव्यापी मस्जिदीत आहे त्यास मोकळा करावा लागेल.त्यावेळी त्यांनी सर्व धर्म समान ही कविता पुढे म्हणत सरकारच्या व्यंगावर बोट ठेवले आहे.
त्यांनी त्यावेळी कोपरगाव पोलीस ठाण्यात एक जिहादी पकडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पोलीस असे कर्तव्यदक्ष राहिले तर मोर्चा काढण्याची गरज राहणार नाही.त्यावेळी त्यांनी मशिदी वरील बांग देणारे भोंगे काढण्याची मागणी केली आहे.हे थांबवले नाही तर आम्ही या पुढे आमच्या घरावर आम्ही महादेवाचे भोंगे लावू असा इशारा दिला आहे.
देशाला हिंदुस्थान घोषित करा अशी मागणी त्यांनी केला आहे.लव्ह जिहाद करणाऱ्यांचा आर्थिक प्रतिबंध केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.त्याचवेळी हिंदूंनी परिवार प्रबोधन केले पाहिजे.व परिवाराला वेळ दिला पाहिजे अशी गरज प्रतिपादन केली आहे.
कोपरगाव शहरातील कत्तल खाने त्वरित बंद करा अन्यथा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू.आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका असा इशारा दिला आहे.
त्यावेळी त्यांनी देशभरात,’लव्ह जिहाद’ विरोधी कायदा झालाच पाहिजे,राज्यात गोहत्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर मदरशे व मस्जिद बंद केल्या पाहिजे.पाकिस्तानात ३४ हजार मदरशे आहेत तर महाराष्ट्रात ७४ हजार मदरशे आहेत.पाकिस्तानला मदरशानी पाकिस्तान बरबाद केला असा आरोप त्या देशाचे लष्कर प्रमुख यांनी केला आहे.त्यावेळी त्यांनी आ.अबू आजमी याच्या “वंदे मातरम” म्हणणार नाही या वाक्याचा समाचार घेतला आहे.व “आईच्या पाया पडणार नाही” या वाक्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.त्यावेळी हिंदू व्यापाऱ्यांना आपला हिस्सा हा धर्मकार्यासाठी देण्याचे आवाहन केले आहे.हिंदू धर्मासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.कोणत्याही पक्षात रहा मात्र हिंदू म्हणून राहा असे आवाहन केले आहे.जाती सोडण्यापेक्षा जातीयवाद सोडा असे आवाहन त्यांनी केले आहे.हिंदू मुलाबरोबर मुस्लिम मुलगी लग्न करतील तर सवती बंद होतील.त्यांना मुलांची फ़ॅक्टरी बंद करण्याची संधी असून आरोग्य सुधारेल.त्यांना सुरक्षा प्राप्त होईल.काळा बुरखा घालावा लागणार नाही.हिंदू मुलाच्या संपत्तीत समान हक्कांची मालक होतील,त्यांचे तीन तलाक पासून संरक्षण होईल.त्याच घरात पुनर्जन्म होईल असा विश्वास दिला आहे.त्यावेळी त्यांनी आपल्या घरातील सदस्यांचे संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.

सदर प्रसंगी सागर बेग यांनी मार्गदर्शन करताना
कोपरगाव शहरातील पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यास काही तासात त्यास अटक केल्याचे जाहीर करून बेग यांनी शहर पोलिसांचे कौतुक करताना त्यांनी या प्रकरणात
हिंदू मुलगा मदत करण्यास गेला असता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी मारहाण केली असल्याचा गंभीर आरोप केला व कारागृहात बंद असलेल्या आरोपीस पोलिसांनी भ्रमनध्वनी सेवा पुरवली असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान आज संपन्न झालेल्या,’हिंदू जनाक्रोश मोर्चा’ला प्रथमच माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवणी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,आ.आशुतोष काळे यांच्या मातोश्री पुष्पाताई काळे आदींनी हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.एरव्ही यासह प्रमुख नेत्यांची अशा कार्यक्रमांना दांडीच असते मात्र अशी घटना प्रथमच घडत असल्याने या नेत्यांनी अनेक दशके सांभाळलेली अल्पसंख्याक तुष्टीकरण भूमिका सोडली का ? की बहुसंख्याक समाज विरोधी जाऊ नये यासाठी ही सोय केली आहे यावर उलटसुलट चर्चा शहर आणि तालुक्यात सुरू झाली आहे.

जिहादींनी नगर जिल्ह्यास विळखा घातला आहे.ज्या मदरशांत बलात्कार केला आहे त्याला बुलढोजर चालून पाडून टाकावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.कोपरगावात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मदत केल्याने मोठी गर्दी झाली असल्याचे कौतुक केले आहे.महाविद्यालयात हिंदू मुलींना त्रास देतात त्यांचा बेत पाहिला असल्याचे सांगून समर्थन दिले आहे.१८ हिंदू मुली फसवल्या होत्या त्यातील ११ मुली परत मिळवल्या असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान आज या आंदोलनानिमित कोपरगाव शहरासह तालुक्यातील बहुतांशी खेड्यातील दुकाने व व्यापार बंद ठेवण्यात आला होता.व उपस्थित नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मात्र पोलीस प्रशासनाने व्यक्त केलेला १०-१२ हजार नागरिकांचा अंदाज सपशेल चुकला आहे.

दरम्यान आज संपन्न झालेल्या ‘हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे निवेदन स्विकारण्यासाठी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर व कोपरगावचे तहसिलदार संदीपकुमार भोसले यांनी हजेरी लावली होती त्याबाबत मोर्चेकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या मोर्चाचे संयोजकांनी यशस्वी नियोजन केल्याबद्दल हिंदू नागरिकांनी संघर्ष समितीचे कौतुक व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन सागर बेग,अर्चना ठाकूर
यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.उपस्थितांचे आभार कलविंदर दडीयाल यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close