आंदोलन
बिबट्या बरोबर…त्या लांडग्यांचा बंदोबस्त करा -मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अनेक दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात दहशत परविणारे बिबटे आता कोपरगाव शहरातही शिरल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.बिबटे पकडण्यासाठी वन विभागाने त्वरित पावले उचलली पाहिजेत अशी मागणी अनेकजण करताहेत.मागणी अतिशय योग्य आहे.
“आजपर्यंत कोपरगाव शहरात-तालुक्यात अनेक हिंदू मुली पळवून बाटविण्यात आल्या.पण बदनामीच्या भितीने संबंधित परिवार तक्रार देत नाहीत.पण सध्या ताजे असलेले प्रकरण फारच गंभीर आहे.मुलीला प्रेमाच्या जाळ्या ओढून,मदरसात बलात्कार करून,फोटो काढून,धमकी देऊन,कलमा पढायला लावून,परराज्यात नेऊन मौलवीच्या संगनमताने धर्मांतर करण्याचा भयानक प्रकार घडलेला आहे.त्यामुळे या प्रकरणात समाविष्ट लांडग्यांच्या बंदोबस्त गरजेचा आहे”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
पण या गोंधळात कोपरगाव शहरात हिंदु मुलींना पळविणारे काही लांडगे हैदोस घालताहेत याकडे आपले दुर्लक्ष व्हायला नको.बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी जोरात सुरू आहे.पण ‘लव्ह जिहाद’चा कट रचून मुली पळविणाऱ्या लांडग्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी ठराविक कार्यकर्तेच करताहेत.हिंदूंच्या मुली पळविणारे आपल्याच शहरातील आपल्यातीच काही ‘लांडगे’ आहेत.आपल्या कुणाच्याही घरावर असे संकट येऊ शकते याचे भान सर्वांनाच यायला पाहिजे.आजपर्यंत कोपरगाव शहरात-तालुक्यात अनेक हिंदू मुली पळवून बाटविण्यात आल्या.पण बदनामीच्या भितीने संबंधित परिवार तक्रार देत नाहीत.पण सध्या ताजे असलेले प्रकरण फारच गंभीर आहे.मुलीला प्रेमाच्या जाळ्या ओढून,मदरसात बलात्कार करून,फोटो काढून,धमकी देऊन,कलमा पढायला लावून,परराज्यात नेऊन मौलवीच्या संगनमताने धर्मांतर करण्याचा भयानक प्रकार घडलेला आहे.तशी फिर्यादच मुलीने दिलेली आहे.पण काहीजण त्याविरुद्ध बोलायचे टाळताहेत असे दिसते.त्यांना जाहीरपणे सांगतो कि, आताच जागे व्हा,अन्यथा हिंदू मुली पळविणारे लांडगे कुणाच्याही घराकडे आपली नजर टाकू शकतात.याविरोधात आवाज उठविणाऱ्या निःस्वार्थ कार्यकर्त्यांना साथ देणे हे सर्वांचे कर्तव्यच आहे.*कशाला वाईटपणा-मते कमी होतील असा विचार करणारे कालांतराने पस्तावल्याशिवाय रहाणार नाहीत असा इशारा आपण आज सर्वांनाच देऊन ठेवतो आहे.
सर्वसामान्य प्रामाणिक-कष्टाळू मुस्लिमांबद्दल आमचा काहीच आक्षेप नाही.पण नेहमीच सर्वत्र चोमडेगिरी करून साव असल्याचा आव आणणारे जे कुणी वावरताहेत त्यांच्यापासून सावध रहा.काही वर्षांपूर्वी एका मुस्लिम भगिनीची विटंबना झाली तेंव्हा सर्व कोपरगाववासियांनी त्याविरुद्ध आंदोलन केले होते.त्यावेळी तहसीलसमोर काहींनी गदारोळ केल्याने माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनाही भाषण करता आले नव्हते.त्याउलट सध्या बलात्कारी नराधमांना वाचविण्यासाठी काही शहाजोग प्रयत्न करताहेत हे दुर्दैवी आहे.ज्यांना मतांचे किळसवाणे राजकारण करायचे त्यांना करू द्या.आपण आज जागे झालो नाहीतर मुलींना-महिलांना पळविणारे लांडगे कुणाचाही घात करू शकतात असा इशारा शेवटी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे.