जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अभिष्टचिंतन कार्यक्रम

…यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा संपन्न !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांचा वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

 सदर प्रसंगी  इंटर हाऊसेस स्पर्धेचा उद्घाटनपर सामना १४ वर्षाखालील ऑरेंज हाऊस व ब्ल्यू हाऊस यांच्या दरम्यान झाला.सदर सामना ऑरेंज हाऊस ने सडन डेथ मध्ये जिंकला.दुसरा सामना हाऊस व ग्रीन हाऊस दरम्यान झाला सदर सामना ग्रीन हाऊसने सडन डेथ मध्ये जिंकला आहे.

  यावेळी सकाळच्या सत्रात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.तर दुपारच्या सत्रात शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मेस विभाग परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविली व सायंकाळी इंटर हाऊसेस फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येवून अनोख्या पद्धतीने सचिव चैताली काळे यांना वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.संध्याकाळच्या सत्रात प्राचार्य नूर शेख यांच्या सहित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रमदान करून क्रिकेट,हॉकी, फुटबॉल ग्राउंड व शाळेच्या परिसराची स्वच्छता केली.

  यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधत फुटबॉल मैदानावर इंटर हाऊसेस स्पर्धांचा शुभारंभ संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांच्या हस्ते करण्यात आला.

  यावेळी प्राचार्य नूर शेख,सुशीलामाई काळे महविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य सुभाष भारती,मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे आदी मान्यवर उपस्थित होते.

  इंटर हाऊसेस स्पर्धेचा उद्घाटनपर सामना १४ वर्षाखालील ऑरेंज हाऊस व ब्ल्यू हाऊस यांच्या दरम्यान झाला.सदर सामना ऑरेंज हाऊस ने सडन डेथ मध्ये जिंकला.दुसरा सामना हाऊस व ग्रीन हाऊस दरम्यान झाला सदर सामना ग्रीन हाऊसने सडन डेथ मध्ये जिंकला. त्याकामी क्रीडा विभागातील क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद,ऑरेंज हाऊसचे मास्टर नसिर पठाण, ब्ल्यू हाऊसचे मास्टर प्रकाश भुजबळ, येलो हाऊसचे मास्टर उत्तम सोनवणे व शिक्षक वृंद आदींनी मेहनत घेतली.


सदर प्रसंगी स्पर्धांचे सूत्रसंचालन कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close