अभिष्टचिंतन कार्यक्रम
… या आमदारांचा वाढदिवस उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अनेक भाविक वर्तमानात उत्तराखंड राज्यात केदारनाथ आणि बद्रीनाथ या यात्रेसाठी गेलेले असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करून भगवान बद्रिनाथाच्या चरणी आ.आशुतोष काळेंना मंत्रीपद मिळावे अशी प्रार्थना केली असल्याचा दावा केला असल्याची माहिती त्यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान आज सकाळी आ.आशुतोष काळे हे श्री साईबाबांचे दर्शन करून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत उपस्थित होते.
कोपरगाव मतदार संघातील काही भाविकांसह आ.आशुतोष काळे यांचे कार्यकर्ते केदारनाथ,बद्रीनाथ यात्रेसाठी गेले असून काही दिवसांपूर्वी उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून पूल व रस्ते वाहून गेल्यामुळे या कार्यकर्त्यांना केदारनाथाचे दर्शन न घेता माघारी परतावे लागले होते.त्यावेळी आकाळे यांनी स्वत: सर्व कार्यकर्ते व त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांची भ्रमनध्वनीवरून संपर्क करून काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

त्यामुळे या कार्यकर्त्यांनी श्री क्षेत्र बद्रीनाथ येथे गरिबांना फळे वाटून आ.काळे यांचा वाढदिवस साजरा केला असल्याचा दावा त्यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने केला आहे.व ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून त्यांना मंत्रीपद मिळावे व कोपरगाव मतदार संघाचा अधिकाअधिक विकास व्हावा अशी प्रार्थना भगवान बद्रीनाथ चरणी केली असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान आज सकाळी आ. काळे हे श्री साईबाबांचे दर्शन करून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत उपस्थित होते.त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केक आणून व पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.तर शिंगणापूर येथील कार्यकर्ते युवराज कुऱ्हाडे यांनी काळे गटात प्रवेश केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.