जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

कडकडासह विज पडली,कोपरगाव तालुक्यात मोठा अनर्थ टळला !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत शिवारात सोमवार मार्च रोजी शेत गट क्रमांक मधील अरुण नरहरी भाकरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळून त्यात नारळाच्या झाडाचा चक्काचूर झाला असून नजीक असलेल्या विजेच्या तारांतून विजेच्या प्रवाह थेट भाकरे यांच्या स्वयंपाक घरात जाऊन तेथील इलेक्टरीक शेगडिचा स्फोट होऊन तो वीज प्रवाह थेट फरशी फोडून जमिनीत गेल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून सुदैवाने त्या स्वयंपाक घरात कोणी नव्हते त्यामुळे जीवित हानी झाली नाही.

“नुकत्याच विजेच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पडलेल्या पावसाने मात्र तेथील शेतकरी अरुण नरहरी भाकरे व आशाबाई अरुण भाकरे यांच्या घराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर एक वीज कडकडाट करत कोसळली आहे.त्यात त्या झाडाचा चक्काचूर झाला आहे.जवळच गॅसचे सिलेंडर व गायींचा गोठा होता मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही”-चंद्रशेखर कुलकर्णी,माजी संचालक, कर्मवीर काळे सहकारी कारखाना.

कोपरगावसह नगर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अवकाळी पासून पडला असून काढणीस आलेली रब्बीची पिके भुईसफाट झाली आहे.धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी त्याला अपवाद नाही.भाकरे यांचे शेत व वस्ती हि गावाच्या पूर्वेस असून धामोरी-मायगाव देवी चौफुलीजवळ त्यांची वस्ती आहे.या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असून त्यात रब्बी पिकांची धूळधाण झाली आहे.मात्र विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पडलेल्या पावसाने मात्र तेथील शेतकरी अरुण नरहरी भाकरे व आशाबाई अरुण भाकरे यांच्या घराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर एक वीज कडकडाट करत कोसळली आहे.त्यात त्या झाडाचा चक्काचूर झाला असल्याची माहिती कर्मवीर काळे सहकारी कारखाण्याचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली आहे.

दरम्यान सदर वीज नजीक असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारांना छेदून गेल्याने तो विजेच्या मोठा प्रवाह थेट भाकरे यांच्या घरात गेला आहे.त्यात त्यांच्या घरातील दुरदर्शन संच,इलेक्टरीक वस्तू आदींचा धूर करून टाकला आहे.दरम्यान त्यांच्या स्वयंपाक घरात एक इलेक्टरीक शेगडी होती.त्यात या विजेच्या प्रवाहाने प्रवेश करून त्यांच्या घरातील शेगडीचा बार उडवून दिला आहे.तो विजेच्या प्रवाह तेवढ्यावर थांबला नाही.तो जमिनीत जाताना त्याने तेथील फरशी फाडून जमिनीत प्रवेश केला आहे.मात्र त्याच स्वयंपाक घरात गॅसचे सिलेंडर होते ते थोडक्यात बचावले आहे.अन्यथा होत्याचे नव्हते झाले असते.नजीकच गायांचा गोठाही होता तेथील पशुधनही सुदैवाने बचावले आहे.त्यांनी परमेश्वराचे आभार मानले नसेल तर नवल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close