अपघात
विद्युत तारांचे घर्षण,नऊ एकर ऊस जाळून खाक,कोपरगाव पोलीस ठाण्यात नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत राहिवसी असलेले शेतकरी प्रशांत शिवाजीराव वाबळे (वय-४२) यांचा नऊ एकरावरील ऊस आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महावितरणच्या तारांचे स्पार्किंग होऊन जळून खाक झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद केली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
“सदर ऊस गळीताला होता याची कबुली दिली असून सदर अग्नी तांडवामुळे बहुतांशी भागात खोडक्या झाल्याने सांगून किमान एकरी पन्नास ते साठ टन असे एकूण ५.४० लाखांचे नुकसान झाले असून साधारण एक तासाने संजीवनी सहकारी कारखान्याचा अग्नीशामक बंब आला मात्र तोवर आगीने आपला प्रताप संपवला होता.घटनेनंतर कर्मवीर काळे साखर कारखान्याच्या शेतकी विभागाचे अधिकारी,महसूल अधिकारी,महावितरण कंपनीचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे”-प्रशांत वाबळे,बाधित शेतकरी,सुरेगाव.
वर्तमानात उसाचा या वर्षीचा गळीत हंगाम सुरु झाला असून ऊस कारखाने ते तोडून नेत आहे.मागील वर्षी ऊस अतिरिक्त निर्माण झाल्याने तो गळीत करताकरता कारखानदारांच्या नाकी नऊ आले होते.त्यामुळे अनेक जण उसाला आग लावून तातडी दाखवून सदर ऊस कारखान्यांना नेण्यास भाग पाडत होते.तर काहींना अतिरिक्त ऊस नेण्यासाठी रोख स्वरूपाचा आहेर ठेकेदार आणि ऊस तोडणी मजूर यांना द्यावा लागत होता.यावर्षीही अतिरिक्त उसाची वेगळी स्थिती नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस कारखानदार नेणार की नाही याची धास्ती निर्माण झाली आहे.अशातच गळीत हंगामाला सुरुवात होऊन महिना-दीड महिना उलटत नाही तोच हि स्थिती निर्माण झाली का ? असा सवाल निर्माण झाला असताना आज कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील प्रशांत शिवाजीराव वाबळे यांच्या उसाला आग लागली असल्याचे वृत्त हाती आले आहे.त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान आज हाती आलेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीच्या या अग्निकांडात प्रशांत वाबळे यांच्या नजीकचे शेतकरी संजय सुंदरराव कदम यांचा तीन एकर,योगेश प्रतापराव कदम,राजेंद्र नारायणराव वाबळे यांचाही ऊस जाळून खाक झाला आहे.दरम्यान जवळ हाकेच्या अंतरावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व त्यांचा अंगिशामक बंब असताना एवढा ऊस जळाला तरी कसा असा सवाल निर्माण झाला आहे.मात्र याबाबत माहिती घेतली असता सदर काळे सहकारी साखर कारखाण्याचा अग्नीशामक बंब हा पासिंग साठी श्रीरामपूर याठिकाणी गेला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान या प्रकरणी सुरेगाव येथील शेतकरी प्रशांत वाबळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी या मोठ्या आकस्मित जळिताची नोंद दाखल केली आहे.तात्यांनी त्यात महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारांचे स्पर्किंग होऊन सदर जळीत झाले असल्याची नोंद केली आहे.याबाबत आता महावितरण कंपनी नेमकी काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.