अपघात
सव्वा लाखांची मतांची बेगमी भोवली,बळी थांबता थांबेना !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गत महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे हे खरे असले तरी पावसाच्या आधीही खड्ड्यांचा सुकाळ होता आणि त्याला पावसाने बरकत आली आहे.मात्र तालुक्याला प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटून काम करणाऱ्या नेत्याचा मोठा दुष्काळ निर्माण झाला असून नेते आपला निधी केवळ सोशल मीडियावर मोजण्यात दंग असल्याचे दिसून येत असल्याने अनेक बळी जावूनही त्याच्यापासून कोणीही बोध घेण्यास तयार असल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे मृत्यूचा हा खेळ थांबणार केंव्हा असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

शिर्डीला गर्दीच्या काळात मदत करणाऱ्या आणि त्यामुळेच त्या रस्त्याचा बोऱ्या उडाला असताना पुणतांबा फाटा ते संगमनेर रस्त्याला एक आणा मिळाला नाही.लोकप्रतिनिधी केवळ पाहत राहिले तर पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना शिर्डी येथील साई भक्तांपेक्षा आपले संस्थान महत्वाचे वाटले असावे.त्यासाठी त्यांनी शिर्डीच्या पालखी मार्ग थेट नांदूर शिंगोटे मार्गे तळेगाव दिघे,लोहारे,लोणी,पिंपरी निर्मळ मार्गे शिर्डीकडे वळवला आहे.त्यांचा गुजरात,मुंबई आणि नाशिक वरून शिर्डी या तीर्थक्षेत्रास हा सर्वात जवळचा मार्ग हा त्यांच्या शोधाला खास,’नोबेल पारितोषिक ‘ द्यायला हवे.
नादुरुस्त रस्ते ही एक मोठी समस्या बनली आहे,ज्यामुळे अपघात,वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या गैरसोयीत वाढ होत आहे.पावसामुळे रस्ते खराब होणे,शहरात अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त पार्किंग,तसेच रस्त्यांच्या बांधकामासाठीचे तंत्रज्ञान आणि अंमलबजावणीतील त्रुटी यांसारखी अनेक कारणे या समस्येमागे आहेत.मात्र नेत्यांचे दुर्लक्ष ही वर्तमानात मोठी गंभीर समस्या बनली आहे.उत्तर नगर जिल्हा त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील आणि विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यातील नेते हे जनतेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी मोठे शाप ठरले आहे.परिणामी कोणत्याही प्रश्नाचे केवळ राजकारण करणे स्वतःला सोशल मीडियातून आपल्या समर्थक भाटांकडून मिरवून घेणे आणि जनतेची करमणूक करणे एवढीच कामे या नेत्यांच्या हाती दिसून येत आहे.त्यामुळे केंद्रीय नेते आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सपशेल या नेत्यांच्या नाठाळपणा पुढे सपशेल लोटांगण घातले आहे.हे नेते आपल्या भ्रष्ट संपत्तीमूळे कोणालाही मोजण्यास तयार नाही असे वर्तमानात दिसून येत आहे.राज्यात आणि देशात कोणत्याची पक्षाचे सरकार असो.या मद्य सम्राट नेत्यांनी त्यांना पक्षनिधी दिला की ते कोणत्याही पक्षाची सत्ता असो ते जनतेच्या मुंड्या पिळण्यास मोकळे आहे.आता तर आय. ए.एस.अधिकारी त्यांच्या या कर्तूत्वापुढे लोटांगण घालताना दिसत आहे.परिणामी आता जनतेला लुबडण्याचा त्यांना थेट परवाना मिळाला असल्याचे दिसून येत आहे.परिणामी येवला नाका येथे खड्ड्यात तरुणाचा दिवसा ढवळ्या मृत्यू होतो आणि जनता ते पाहण्या पलीकडे काही करू शकत नाही.सावळीविहिर जवळ अशीच एक घटना पाच वर्षापूर्वी घडली होती.त्यात एक बहिण आणि भाऊ दिवाळी निर्मित आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीस अवजड ट्रकचा धक्का बसला होता.त्यात तरुणीचा भाऊ जागीच ट्रकच्या मागील चाकाखाली दबला जाऊन मृत्युमुखी पडला होता.तिचा हंबरडा कोणाही सुज्ञ जणाचे हृदय पिळवटून टाकणारा ठरला होता.अशीच घटना टाकळी येथील देवकर या स्वप्न रंगविण्याच्या काळात काळाचा घाला पडणाऱ्या तरुणाबाबत नुकतीच घडली आहे.त्याच्या स्वप्नाचा चक्काचुर झाला असल्याचे दिसून आला आहे.त्याच्या आई आणि वडिलांच्या आणि कुटुंबाच्या दुःखास पारावर राहणार नाही हे ओघाने आलेच.

कोपरगाव तालुक्यातील नादुरुस्त रस्त्याबाबत कोपरगाव विधानसभा लोकप्रतिनिधीला आपल्या तोंडातून गुळणी सोडता आली नाही यातच सर्व काही आले आहे.पुणतांबा फाटा आणि कोपरगाव बेट येथील वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिस अधिकारी वैतागले असून प्रवाशी त्यांना नको ते बोलत आहे.तर कोपरगावच्या सत्ताधारी दोन्ही पुढाऱ्यांना प्रवाशी शेलकी विशेषणे जोडत आहे.मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेले तब्बल सव्वा लाखांची मतांची बेगमी लोकांना आता चांगलीच नडू लागली आहे.
दरम्यान त्यावर सोशल मीडियावर एक दिवस नेते आणि अधिकारी यांचेवर शिव्यांचा भडीमार आणि मोठे आशीर्वाद मिळाले.त्यावर नेत्यांनी आपण किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवणारा व्हिडिओ प्रसारण करून आपली पाठ थोपटून घेतली आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी यांची मिरवणूक संपन्न झाली.वृत्तपत्रात बातम्या आणि मथळे आले आहेत.हा तमाशा अनेक वेळा जनतेने पाहिला आहे.मात्र त्यापुढे कोणत्याही रस्त्याची डागडुजी झाली असल्याचे दिसून आले नाही.पुणतांबा फाटा येथील वाहतूक कोंडी तर नित्याची बनली आहे.तेथील आणि कोपरगाव बेट येथील पुल केंव्हा होणार हे थेट ब्रम्हदेवास ठाऊक.गेली पंचवीस वर्षे या रस्त्याचा तमाशा सुरू आहे.किती बळी गेले याची मोजदाद नाही आणि आर्थिक नुकसानीची गणती नाही.आता जिल्हाधिकारी यांची थेट मिरवणूक झाली म्हणतात.पण हा देखावा म्हणजे,’बैल गेला आणि झोपा केला ‘ या थाटनीचा म्हणावा लागेल दुसरे काय ? पण स्थानिक नेते हे केवळ बळी गेल्यावरच जागे होणार का ? असा सवाल जनतेत निर्माण झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील आणि विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यातील नेते हे जनतेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी मोठे शाप ठरले आहे.परिणामी कोणत्याही प्रश्नाचे केवळ राजकारण करणे स्वतःला सोशल मीडियातून आपल्या समर्थक भाटांकडून मिरवून घेणे आणि जनतेची करमणूक करणे एवढीच कामे या नेत्यांच्या हाती दिसून येत आहे.त्यामुळे केंद्रीय नेते आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सपशेल या नेत्यांच्या नाठाळपणापुढे सपशेल लोटांगण घातले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातलं जुना नागपूर महामार्गावरील गोदावरी नदीवरील पुलाला भगदाड पडले असल्याची माहिती तेथील प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.त्या ठिकाणी काही बळी जाण्याची अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बहुधा वाट पाहत असावे असे मानण्यास मोठी जागा आहे.तीच बाब झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याची झाली आहे.या मार्गावर अनेक बळी गेले आहे.ए.डी.बी.बँकेने 189 कोटींचा निधी प्रस्तावित केला असताना त्याकडे त्यांनी त्यावेळी पाठ फिरवली आणि आता त्याचाच पाठपुरावा स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुरू केला आहे हे आक्रितच म्हंटले पाहिजे.आगामी 2027 साली सिहंस्थ कुंभमेळा येऊन ठेपला आहे.त्यासाठी जवळपास तीस हजार कोटींचा निधी मुख्यमंत्री,केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला.मात्र जवळके मार्गे शिर्डी या तिर्थक्षेत्रास जाणाऱ्या साईभक्तांना सर्वात जवळचा ठरणारा रस्ता म्हणून ज्यांची ओळख आहे.त्या रस्त्यास एक फुटक्या कवडीची तरतूद केली नाही.याबाबत लोकप्रतीनिधी मौनीबाबा बनले आहे.तीच बाब शिर्डीला गर्दीच्या काळात मदत करणाऱ्या आणि त्यामुळेच त्या रस्त्याचा बोऱ्या उडाला असताना पुणतांबा फाटा ते संगमनेर रस्त्याला एक आणा मिळाला नाही.लोकप्रतिनिधी केवळ पाहत राहिले.तर पालक मंत्री विखे यांनी त्यांना शिर्डी येथील साई भक्तांपेक्षा आपले संस्थान महत्वाचे वाटले असावे असे दिसून येत आहे.त्यासाठी त्यांनी शिर्डीच्या पालखी मार्ग थेट नांदूर शिंगोटे मार्गे तळेगाव दिघे,लोहारे,लोणी,पिंपरी निर्मळ मार्गे शिर्डीकडे वळवला आहे.त्यांचा गुजरात,मुंबई आणि नाशिक वरून शिर्डी या तीर्थक्षेत्रास हा सर्वात जवळचा मार्ग हा त्यांच्या शोधाला खास,’नोबेल पारितोषिक ‘ द्यायला हवे.मात्र कोपरगाव विधानसभा लोकप्रतिनिधीला आपल्या तोंडातून गुळणी सोडता आली नाही यातच सर्व काही आले आहे.पुणतांबा फाटा आणि कोपरगाव बेट येथील वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिस अधिकारी वैतागले असून प्रवाशी त्यांना नको ते बोलत आहे.तर कोपरगावच्या सत्ताधारी दोन्ही पुढाऱ्यांना प्रवाशी शेलकी विशेषणे जोडत आहे.मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेले तब्बल सव्वा लाखांची मतांची बेगमी लोकांना आता चांगलीच नडू लागली असून आगामी काळात नगरपरिषद आणि जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सुद्धा कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे फोन उचलले जाताना दिसत नाही.त्यावरून आगामी काळ जनतेला किती कठीण जाणार आहे हे पाहणे गरजेचे असून उर्वरित चार वर्षे कशी जाणार हाच सवाल मतदारांना न पडला तर नवल ! पैसा घेऊन मतदान करणाऱ्यांना लाचार मतदारांना त्यांची लायकी आता नक्की कळली असणार हे ओघाने आलेच.
—————————–
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
 
					 
					 
					


