जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

कोपरगाव नजीक अपघात एक जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव नजीक अपघात एक जखमी,गुन्हा दाखल
कोपरगाव तालुक्यातील वैजापूर रस्त्यावर कोकमठाण शिवारात ‘हॉटेल लोकसेवक ‘ जवळ हिरो होंडा कंपनीची एच.एफ.डिलक्स (क्रमांक एम.एच.१७ सी. वाय ४१८२)या भरधाव गाडीने दिलेल्या धडकेत बाबा मुनीर शेख (वय -६५) हे गंभीररीत्या जखमी झाले असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्यावर घोटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.शहर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

 

दुचाकी अपघाताची एक घटना कोकमठाण शिवारात उघडकीस आली आहे.कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या खडकी येथील रहिवासी बाबा मुनीर शेख हे व त्यांचा मुलगा हे कोपरगाव वैजापूर रोडवर उभे राहून रस्त्याच्या पलीकडे चहा पिण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्यांना वरील क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने जोराची धडक देऊन पोबारा केला आहे.

  कोपरगाव तालुक्यातील रस्ते ही वर्तमानात गंभीर समस्या ठरली आहे.त्यामुळे दोन तीन दिवसात अपघात ठरलेला असतो.त्यातून अनेकांचे बळी जात आहे.तर काही जखमी होत आहे. वित्तीय हानीची तर मोजदाद नाही. त्यामुळं नागरिकना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.अशीच एक घटना कोकमठाण शिवारात उघडकीस आली आहे.कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या खडकी येथील रहिवासी बाबा मुनीर शेख हे व त्यांचा मुलगा हे कोपरगाव वैजापूर रोडवर उभे राहून रस्त्याच्या पलीकडे चहा पिण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्यांना वरील क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने जोराची धडक देऊन पोबारा केला आहे.

  दरम्यान फिर्यादी व जखमींचा मुलगा अमजद बाबा शेख (वय-३८) याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात वरील अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस हे.कॉन्स्टेबल जालिंदर तमनर आदींनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५(अ)(ब) सह मोटार वाहन कायदा कलम २३४(अ)(ब)१७७ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल तमनर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close