जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू,गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील आपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहीवासी महिला पूजा समाधान भातकुडव (वय-२९) ही दि.३० जून रोजी गायब झाली होती.तिचा शोध लागत नसताना ती त्याच गावातील सचिन खीलारी यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्याने आपेगाव आणि परिसरात खळबळ  उडाली आहे.या प्रकरणी तिच्यावर काल रात्री ०९ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला असला तरी तिचे कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून येत असून या बाबत तिचे वडील नवनाथ बागुल रा.सावखेड खंडाळा, ता.वैजापूर यांनी उशिराने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीच्या नगर-मनमाड या राज्य मार्गावरील मोठ्या पुलावरून एका अज्ञात महिलेने उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

  

दरम्यान त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता गोदावरी नदीच्या नगर-मनमाड या राज्य मार्गावरील मोठ्या पुलावरून एका अज्ञात महिलेने उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.याबाबत शहर पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही.

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,सदर महिला पूजा भातकुडव हिचे माहेर सावखेडा ता.वैजापूर येथील असून तिचे काही वर्षांपूर्वी आपेगाव येथील तरुण समाधान भातकुडव यांचेशी तिच्या नातेवाईकांनी मोठ्या डामडौलात करून दिले होते.त्यांच्या या संसार वेलीवर दोन अपत्ये फुलली होती.सदर मृत महिलेचा पती आणि ती शेतमजुरी  करून आपल्या प्रपंचाची गुजराण करत होते.त्यांच्यात वादविवाद असल्याची माहिती नाही.मात्र दि.३० जून रोजी सदर महिला गायब झाली असल्याची कुजबुज गावात सुरू झाली होती.या प्रकरणी सदर कुटुंबाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हरवली असल्याची नोंद क्रं.४४/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १९४ प्रमाणे केली होती.तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती.मात्र काल सकाळी त्याच गावातील शेतकरी सचिन खिलारी यांचे शेतातील विहिरीत ती मृत अवस्थेत पाण्यात तरंगताना आढळून आली होती.त्यांनी त्याची खबर पोलिस पाटील यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दिली होती.त्यामुळे त्या ठिकाणी तिला तातडीने विहिरीतून वर काढून तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तिच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी तिचे शव विच्छेदन करण्यास नकर दिला होता.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या दिला होता.त्यानंतर सदर शव हे लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संकल्पित छायाचित्र.

 

या प्रकरणी तिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर काल रात्री ०९ वाजता आपेगाव येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.आज सकाळी पासून गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी जोर लावला होता.आता ते दखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी तिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर काल रात्री ०९ वाजता आपेगाव येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.आज सकाळी पासून गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी जोर लावला होता.आता ते दखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे ही आत्महत्या की खून याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.पोलिस तपासात या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता आहे.

…ती आत्महत्या झाली,वडिलांचा खुलासा,गुन्हा दाखल

   दरम्यान नुकत्याच उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत पूजा भातकुडव विवाहितेची दुसरी बहीण माधुरी बागुल हिचे लग्न तिचा लहान दिर सागर भानुदास भातकुडव याचे सोबत लावून द्यावे या मागणीसाठी सासरा भानुदास भातकुडव,सासू सुमन भातकुडव,दीर सागर भातकुडव आदी तिला तिला शिवीगाळ करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ करून त्रास देत जीवे मारण्याची धमकी देत होते.मात्र जावई समाधान भातकुडव हे समजावून सांगत असताना ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.त्यानंतर मयत मुलगी पूजा भातकुडव हीने आपल्याला फोन करून सांगितले होते की,” मला या ठिकाणाहून घेऊन चला; मला इथे राहायचे नाही” मात्र आपण  बाहेरगावी असल्याने तिला घेण्यास जावू शकलो नाही.दुसऱ्या दिवशी आपण आपेगाव येथे जावून तिची चौकशी केली असता ती घरी नव्हती.आपण तीच्या सासऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ती दि.२९ जून रोजी सकाळी ९.३० वाजे पासून कुठेतरी निघून गेली असल्याचे सांगितले होते.त्याबाबत आपण तालुका पोलीस ठाण्यात तिच्या हरविल्याची तक्रार दाखल केली होती.त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता फोन वरून तिचे सासरे भानुदास भातकुडव यांनी ती एका विहिरीत मृत अवस्थेत मिळून आली असल्याची आपल्याला माहिती दिली होती.त्यानंतर मयत विवाहित तरुणीचे वडील नवनाथ अंबादास बागुल (वय-३९)रा.सावखेड खंडाळा ता.वैजापूर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तिला तिचा सासरा भानुदास भातकुडव,सासू सुमन भातकुडव,दिर सागर भातकुडव आदींनी तिला तिच्या बहिणीच्या लग्नासाठी दबाव आणून तिला वारंवार शिवीगाळ,मारहाण करून तिला दिलेल्या त्रासाला कंटाळून विहिरीत जावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे या प्रकरणाची उकल झाली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ आणि संशयित आरोपी विरुध्द संताप व्यक्त होत आहे.

  या  प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.आर.वाखुरे हे पुढील तपास करत आहेत.

  दरम्यान त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता गोदावरी नदीच्या नगर-मनमाड या राज्य मार्गावरील मोठ्या पुलावरून एका अज्ञात महिलेने उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.याबाबत शहर पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही.याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close