अपघात
रस्ते अपघातात एक जण ठार,कोपरगाव तालुक्यातील घटना

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी इसम पिंटू रामदास मोरे (वय -४५) यांचा धारणगाव येथील म्हसोबा मंदिराजवळ काल सायंकाळच्या ०५ वाजेच्या सुमारास अपघात होऊन त्यात ते गंभीर जखमी होऊन शिर्डी येथे उपचार करण्यास नेले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काल सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास धारणगाव शिवारात कोपरगाव- कोळपेवाडी मार्गावर म्हसोबा मंदिराजवळ घडली आहे.त्यात रवंदे येथील इसम पिंटू रामदास मोरे हे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते.उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दूर होण्याची चिन्हे दिसत नाही परिणामी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशीच एक घटना काल सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास धारणगाव शिवारात कोपरगाव- कोळपेवाडी मार्गावर म्हसोबा मंदिराजवळ घडली आहे.त्यात रवंदे येथील इसम पिंटू रामदास मोरे हे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते.त्यांना नजिकच्या ग्रामस्थानी तातडीने शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
दरम्यान या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना दिली होती.त्यांनी या घटनेची अकस्मात नोंद करून ती माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना दिली आहे.
कोपरगाव पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक २९ /२०२४ भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करीत आहेत.