अपघात
दोघांचा मृतदेह,खून की आत्महत्या चर्चेला उधाण !

न्युजसेवा
कोपरगाव-संवत्सर – (प्रतिनिधी)
नाशिक जलसंपदा विभागाच्या गोदावरी डाव्या कालव्यातील पाण्यात कोपरगाव तालुक्यातील बोलकी शिवारात एक अंदाजे ५०-५५ वयाचे व मजबूत बांधा असलेल्या पुरुष जातीचे प्रेत वाहत आले असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर आणखी दुसरी एक घटना संवत्सर शिवारात उघड झाली असून यात मयत सागर ज्ञानेश्वर सोनवणे (वय -३८) हा खीर्डी गणेश शिवारात रेल्वे लाईन कि.मि.४६६/११ ते ४६६/१३ दरम्यान मृत आढळून आला आहे.याबाबत कोपरगाव तालुक्यात हा खून ही आत्महत्या याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान याबाबत आणखी दुसरी एक घटना संवत्सर शिवारात उघड झाली असून यात मयत सागर ज्ञानेश्वर सोनवणे (वय -३८) याने खीर्डी गणेश शिवारात रेल्वे लाईन कि.मि.४६६/११ ते ४६६/१३ दरम्यान मृत आढळून आला आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी वाहत असून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या दारणा आणि गंगापूर धरणातून सिंचनासाठी नाशिक जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते.या तालुक्यात दोन गोदावरी कालवे असून मराठवाडा जलद कालव्याचा एक मोठा कालवा आहे.सिंचनाचे अथवा बिगर सिंचनाचे पाणी आवर्तन सुटल्यावर बऱ्याच वेळा या ठिकाणी काही अकल्पित घटना घडून पोलिसांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.या शिवाय नगर-दौंड रेल्वेचा मार्ग तालुक्यात जात असून अनेक ठिकाणी अपघात अथवा घातपात होताना दिसत आहे.त्यात अनेकांचे बळी जात असतानाच्या घटना वारंवार होताना दिसत आहे.बोलकी आणि खिर्डि गणेश या ठिकाणी दोन घटना नुकत्याच उघड झाल्या आहे.
याबाबत पहिली घटनेबाबत अंचलगाव येथील पोलिस पाटील दादासाहेब मुरलीधर शिंदे (वय ५४)यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”दिनाक १४ मार्च २०२५ रोजी रात्री १०.५३ वाजता गोदावरी कालव्याचे पात्रात पाईपलाईनला अडकलेले एक पुरुष जातीचे प्रेत आढळले असून त्याचे वय ५०-५५ असून तो शरीराने मजबूत बांध्याचा आहे.रंगाने काळा सावळा उंची ५.५ फूट आहे.चेहरा गोल,नाक बसके,केस बारीक आहे.अंगात पांढरा रंगाचा शर्ट असून त्याच रंगाचा अंगात पायजमा आहे.याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोपरगाव तालुका पोलिस ठाणे यांचे दूरध्वनी क्रमांकावर ०२४२३-२२२२३३ संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी केले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक अनुक्रमे -१८/२२/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम १९४ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.

दरम्यान याबाबत आणखी दुसरी एक घटना संवत्सर शिवारात उघड झाली असून यात मयत सागर ज्ञानेश्वर सोनवणे (वय -३८) याने खीर्डी गणेश शिवारात रेल्वे लाईन कि.मि.४६६/११ ते ४६६/१३ दरम्यान मृत आढळून आला आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्याच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ,एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.त्याच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठी आज दुपारी १२ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोपरगाव तालुका पोलिसांना खबर दिली आहे.याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करत आहेत.