अपघात
कोपरगावात दोघांचा अकाली मृत्यू !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
दिवाळी पाडव्याचा आनंद साजरा होत असताना कोपरगाव तालुक्यातील मढी बु.येथे उमरावती नदीवर गाडी धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.यातील उत्तम राहणे (वय-४२) व माधव गमे (वय-३२) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत.
दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे,जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो.”अंधारावर प्रकाशाचा,वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हा आनंदाचा सन साजरा करत असताना कोपरगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.शनिवारी सर्वत्र दिवाळी पाडव्याची धामधूम सुरू होती.सर्वच कुटुंब आनंद साजरा करीत असताना तालुक्यातील मढी बु.येथील दोन कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.मढी येथील उमरावती नदीवर चारचाकी वाहन धुण्यासाठी उत्तम राहणे गेले होते.गाडी धूत असताना त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले,त्याच वेळी माधव गमे त्यांना वाचवण्यासाठी गेले, परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते.कोपरगाव नगर परिषदेच्या पथकाच्या शोधानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पथकास यश आले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.