अपघात
मोटार अपघात,एक ठार,गुन्हा दाखल
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनार्दन स्वामी मंदिरा नजिक असलेल्या जुनीगंगा देवी मंदिरा जवळ नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी बारा वाजच्या सुमारास एका ट्रकने दिलेल्या धडकेत एक इसम ठार झाला आहे.त्याचे नाव मुजीब जाहेद खान (वय 45)असे असून तो कोपरगाव येथील इंदिरानगर येथील रहिवासी होता.या प्रकरणी शहर पोलिसांनी सदर ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुक्यातून उत्तरेस जाणाऱ्या सावळीविहीर ते इंदोर हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर करण्यात आला असून त्याचे चारपदरी काँक्रीटीकरण काम कोपरगाव पर्यंत सुरू असून अवजड वाहनांना त्यासाठी संबधित ठेकेदार कंपनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत असला तरी त्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मात्र हयगय करताना दिसत आहे.परिणामी या महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच आज दुपारी बारा वाजता जुन्या गंगेच्या जवळ देवी मंदिराचे जवळ घडली आहे.यातील मयत इसम मुजीब खान हा इंदिरानगर येथील रहिवासी इसम आपल्या वाहनाने कोपरगाव येथून शिर्डीच्या दिशेने जात असताना त्यास मागील बाजूने तमिळनाडू राज्यातील ट्रकने (क्रमांक टी.एन.88 के.9937)त्यांना मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनेनंतर आरोपी हा घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला होता.त्याचे नाव मुरगण के.कुप्पुसामे असे असल्याची माहिती आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मयताचे नातेवाईक मुजाहिद नासीर खान (वय -34)यांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके,पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-432/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 106(1),281,125(अ)(ब),324 (4)मोटार वाहन कायदा कलम 184,134(ब) 177 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी.बी.हांडोरे हे करीत आहेत.