जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

मोटार अपघात,महिला जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत हॉटेल स्वस्तिक समोर एका चार चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत ज्योती काकडे (वय -42) रा.शिर्डी ही महिला जखमी झाली असून वाहन चालक फरार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जखमी महिलेचा मुलगा सिद्धेश पवन काकडे याने गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव,शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.

  

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी इसम सिद्धेश पवन काकडे (वय-18 )हा शिर्डी येथील रहिवासी तरुण असून तो आपल्या वाहनाने दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8.25 वाजता शिर्डी कडून संभाजीनगर येथे कोकमठाण हद्दीतून हॉटेल स्वस्तिक समोरून जात असताना त्यास चार चाकी वाहन (क्रमांक एम.एच.42 बी.जे.8016) याने जोराची धडक दिली होती.त्यात त्याची आई नामे ज्योती पवन काकडे हिला मोठा मार लागला होता.त्यात तिला उपचारार्थ डॉ.विखे फाऊंडेशन देहरे घाट येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांना त्या ठिकाणी उपचार दिल्यानंतर त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन वरील वाहनावरील अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-378/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 281,125,(अ),(ब)324,(2)सह मोटार वाहन कायदा कलम 134,(ब),177,184 प्रमाणे वरील अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close