अपघात
अपघातात तरुण ठार,शिर्डीत चोघांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील तरुण अभय संजय पोटे (वय-२१) हा कोपरगाव येथील तुषार होडे व सूरज होडे यांच्या ए.सी.दुरुस्तीच्या दुकानात कामास असताना त्याला शिर्डीत वातानुकूलित यंत्र (ए.सी.) दुरुस्तीसाठी शिर्डीत पाठवले असता त्यास महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत तारांचा शॉक लागून तो त्यात ठार झाला असल्याचा गुन्हा मयत तरुणाचा पिता संजय बाबुराव पोटे (वय-५४) शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी संजय बाबुराव पोटे हे कोपरगाव शहरातही निवारा हौसिंग सोसायटी परिसरात आपल्या कुटुंबासह रहिवासी असून ते कायम आजारी असतात.त्यांना अभय पोटे आणि प्रतीक पोटे ही दोन मुले आहेत.त्यातील धाकटा मुलगा अभय पोटे हा तुषार होडे व सूरज होडे यांच्या रेफ्रिजरेशन व ए.सी.रिपेरिंगच्या दुकानात कामास होता.त्यास साधारण १५-२० हजार रुपये मिळत असत त्यात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
दरम्यान तुषार पोटे हा दि.११ मे २०२४ रोजी होडे बंधूंच्या दुकानात गेला असता त्यास त्यांनी शिर्डी येथील हॉटेल कलासाई कॉम्प्लेक्स मध्ये निवन ए.सी.बसविण्यासाठी कामास गेला होता.दरम्यान दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आपल्याला दुकान मालक तुषार होडे यांचा फोन आला की”तुमचा मुलगा अभय पोटे हा उच्च दाबाच्या विजेच्या धक्क्याने खाली पडला आहे.त्याला आम्ही शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ भरती केला आहे.त्यावेळी आपण आपल्या एका सहकाऱ्यास घेऊन तातडीने शिर्डीत रुग्णालयात गेलो असता त्या ठिकाणी आपला मुलगा अभय पोटे हा मृत झाला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती.दरम्यान त्याचे शव विच्छेदन केल्यानंतर त्याचा अंत्यविधी केल्या नंतर आपण शिर्डी येथे येऊन हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३१९/२०२४ भा.द.वि.३०४(ए)व ३४ प्रमाणे महावितरण कंपनीच्या हलगर्जी पणासह तुषार होडे व सूरज होडे दोघे रा.राम मंदिराजवळ कोपरगाव व आणि आणखी एक अनोळखी संशयित अशा चौघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी हे करीत असल्याची माहिती हाती आली आहे.