जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

मुंबईतून आदेश होऊनही नवीन बस सुरू होईना -ग्रामस्थांत संताप !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यातील शिर्डीच्या साई भक्तांना सर्वात जवळचा ठरणारा जवळके मार्गे श्रीरामपूर- पिंपळगाव बसवंत या गाडीसह दोन राज्य परिवहन मंडळाच्या बस सुरू करण्यास खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून मंजुरी मिळून तीन महिने उलटूनही अद्याप त्या सूरु करण्यासाठी अहिल्यानगर येथील विभाग नियंत्रक टाळाटाळ करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.त्यामुळे जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात यांचेसह साईभक्त,विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान श्रीरामपूर पिंपळगाव बसवंत या बससाठी राज्य परिवहन मंडळाच्या अहिल्यानगर येथील विभाग नियंत्रक चंद्रकांत चौधरी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी श्रीरामपूर येथील बस आगाराचे व्यवस्थापक अनिल बेहरे यांना आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे.मात्र बेहरे यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे एकूण २५१ डेपो आणि ३१ विभागांचे विशाल नेटवर्क असून १४,५०० हून अधिक बसेस चालवल्या जातात.पण,त्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहे.सणासुदीच्या काळात लोकांना बसेसच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आणि महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर बसेस तुडुंब भरलेल्या असतात.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्याचा विस्तार करण्यासाठी ३ हजार नवीन बस खरेदी करण्याची पूर्ण केली आहे.यातील पाच नवीन बस राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या कोपरगाव बस आगारास आल्या आहेत.दरम्यान कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत आणि जनमंगल ग्रामविकास संस्थेने तळेगाव दिघे मार्गे कोपरगाव ते संगमनेर या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवीन बस सुरू करण्याची मागणी दिनाक १९ मार्च २०२४ रोजी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांचेकडे केली होती.तर जवळके,सायाळे मार्गे शिर्डी-नाशिक व श्रीरामपूर -पिंपळगाव बसवंत बस सुरू करण्याची मागणी दि.०२ डिसेंबर २०२४ रोजी शिर्डीचे खा
भाऊसाहेब वाकचौरे यांचेकडे केली होती.त्यासाठी त्यांनी मुंबई,नाशिक,अहिल्यानगर येथील वाहतूक अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता.त्यासाठी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमांतून मुंबई येथील वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक ०८ एप्रिल २०२५ रोजी यांचेकडे सदर बस सुरू करण्याची शिफारस केली होती.

 

याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव बस आगाराचे प्रमुख अमोल बनकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, कोपरगाव बस आगारातील ७० पैकी ३१ बस कोकणातील गणपती उत्सवासाठी रवाना होत आहे.तर ४- ५ बस नेहमी देखभालीसाठी उभ्या असतात.मात्र गणपती उत्सवानानंतर कोपरगाव-जवळके बस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

   त्यानुसार मुंबई येथील महाव्यवस्थापक कार्यालयाने नगर येथील कार्यालयास दि.०२ मे २०२५ या दिवशी सदर बस सुरू करण्याचे आदेश नुकतेच दिले होते.त्यांनी कोपरगाव आणि श्रीरामपूर येथील आगार व्यवस्थापक यांना यांना या बस सुरू करण्याचे १९ एप्रिल २०२५ रोजी फर्मान काढले होते.त्या नुसार सदर बस कोपरगाव येथील परिवहन मंडळाचे आगार प्रमुख अमोल बनकर यांनी कोपरगाव जवळके ही बस सुरू केली होती.तिला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता.मात्र हि बस अल्पावधीत बंद पडली आहे. या बाबत जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र ती अद्याप पुन्हा सुरू झालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.तर श्रीरामपूर पिंपळगाव बसवंत ही बस वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप सुरू केलेली नाही.त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव बस आगाराचे प्रमुख अमोल बनकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, कोपरगाव बस आगारातील ७० पैकी ३१ बस कोकणातील गणपती उत्सवासाठी रवाना होत आहे.तर ४- ५ बस नेहमी देखभालीसाठी उभ्या असतात.मात्र गणपती उत्सवानानंतर कोपरगाव-जवळके बस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

  दरम्यान या दोन्ही बस तातडीने सुरू कराव्या अशी मागणी जवळके येथील सरपंच सारिका थोरात,ज्येष्ठ कार्यकर्ते एस.के.थोरात,सर्व सदस्य,बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे,सायाळे सरपंच विकास शेंडगे,वेसचे माजी सरपंच माणिक दिघे,धोंडेवाडीचे सरपंच राजेंद्र नेहे,बहादरबाबादच्या सरपंच अश्विनी विक्रम पाचोरे,शहापूरच्या सरपंच योगिता रमेश डांगे,दूषिंगपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,डॉ विजय शिंदे आदींनी केली आहे.

  दरम्यान श्रीरामपूर पिंपळगाव बसवंत या बससाठी राज्य परिवहन मंडळाच्या अहिल्यानगर येथील विभाग नियंत्रक चंद्रकांत चौधरी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी श्रीरामपूर येथील बस आगाराचे व्यवस्थापक अनिल बेहरे यांना आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे.मात्र बेहरे यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close