जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

   दोन वाहनांच्या धडकेत एक ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका हद्दीत जुना मुंबई-नागपूर महामार्गावर हॉटेल द्वारकामाई जवळ रियर रिक्षा (क्रं.एम.एच.२० ई.के.१८८८) व महिंद्रा पिकअप गाडी (क्रं.एम.एच.१६ए.ई.७४०२) यांच्यात काल रात्री ०८ वाजेच्या सुमारास समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत छत्रपती संभाजीनगर येथील तरुण धम्मपाल लक्ष्मण गायकवाड (वय-१९) हा तरुण ठार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही संकल्प चित्र.

 

वाहन चालक समृद्धी महामार्गावरील वाहतूक टोल टाळण्यासाठी या मार्गावरून जाण्यास पसंती देत आहे.परिणाम स्वरूप या राज्य महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वहातूक वाढली आहे.रस्त्यावरील खड्डे कमी झाल्याने माल वाहतूक चालक हे भरधाव वेगाने आपली वहाने चालवत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.अशाच एका अपघातात संभाजीनगर येथील तरुण ठार झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात मुंबई-नागपूर हा जुना महामार्ग सुरळीत झाला असून यावरील खड्डे बुजवलेले आहे.त्यामुळे वाहन चालक समृद्धी महामार्गावरील वाहतूक टोल टाळण्यासाठी या मार्गावरून जाण्यास पसंती देत आहे.परिणाम स्वरूप या राज्य महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वहातूक वाढली आहे.रस्त्यावरील खड्डे कमी झाल्याने माल वाहतूक चालक हे भरधाव वेगाने आपली वहाने चालवत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यातील जुना मुंबई-नागपूर महामार्गावर हॉटेल द्वारकामाई जवळ रियर रिक्षा (क्रं.एम.एच.२० ई.के.१८८८) व महिंद्रा पिकअप गाडी (क्रं.एम.एच.१६ए.ई.७४०२) यांच्यात काल रात्री ०८ वाजेच्या सुमारास समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत छत्रपती संभाजीनगर येथील तरुण धम्मपाल लक्ष्मण गायकवाड (वय-१९) हा तरुण ठार झाला आहे.

    सदर प्रकरणी फिर्यादी दिपक राजू पगडे (वय-२४) रा.नायगाव रोड सहारा वैभव अपार्टमेंट हर्सूल सांगवी,संभाजीनगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी वरील क्रमांकाच्या पिकअप वरील चालक याचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा दाखल  केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलीस हे.कॉ.संतोष लांडे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३०/२०२४ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,अ,ब,१८७  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
  
   या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.लांडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close