जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

कोपरगावात तरुणांचा मृत्यू,नागरिकांचे आंदोलन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील १०५ हनुमाननगर भागात फुटलेल्या पाईपच्या गटारीमध्ये सचिन गहिनीनाथ गजर (वय-३०) या तरुणांचा पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून नागरिकांनी या संबंधी आंदोलन करून पालिका प्रशासनास जाब विचारून सदर कुटुंबाला न्याय मागितला आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाची भलतीच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.मात्र स्थानिक नेत्यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

मयत दुर्दैवी तरुण सचिन गजर याचे छायाचित्र.

सदर मयत तरुण सचिन गजर हा पावसाच्या भीतीने आपले घर जवळ करत असताना त्याचा पाय घसरून तो नेमक्या वाहत असलेल्या गटारीत पडला आहे.दुर्दैवाने तो तोंडाच्या बाजूने पडल्याने पावसाने तुडुंब गटारीच्या पाण्यात त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे.

कोपरगाव नगर परिषदेच्या आपल्या अजब कारभाराच्या बहुविध कहाण्या नागरिकांनी यापूर्वी अनुभवल्या असताना कोपरगाव नगरपरिषद हद्दीत हनुमाननगर १०५ मध्ये रहिवासी असललेल्या तरुणाला आपला जीव हकनाक गमवावा लागला असल्याची दुर्दैवी घटना नुकतीच उघड झाल्याने नागरीकानी हळहळ व्यक्त केली आहे.

घटनेनंतर नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात केलेली गर्दी दिसत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”काल दि.२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास विजेचा लखलखाट व पावसाचा गडगडाट व पाऊस सुरु असताना सदर पावसाने गटारी तुडुंब भरून वाहत असताना सदर मयत तरुण पावसाच्या भीतीने आपले घर जवळ करत असताना त्याचा पाय घसरून तो वाहत असलेल्या गटारीचा अंदाज न आल्याने व त्याचा तोल जाऊन तो तोंडाच्या बाजूने गटारीत पडला असल्याने पावसाने तुडुंब गटारीच्या पाण्यात त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे.

सदर घटना नजीकच्या नागरिकांच्या लक्षात आली त्यावेळी उशीर झाला होता.त्यास कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता वैद्यकीय उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्याचा लहानपणापासून त्याच्या आत्याने सांभाळ केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   दरम्यान नजीकच्या नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून या संबंधी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आपला मोर्चा वळवून मयताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत घरातील व्यक्तीस नगरपालिकेत नोकरी आदींची मागणी केली आहे.उपस्थित नागरिकांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनास या घटनेचा जाब विचारला आहे.त्यामुळे यात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभावली असून स्थानिक संजीवनीच्या युवा नेत्यांने सदर कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा तर पालिका प्रशासनाने त्याच्या कुटुंबाला नोकरी देण्याचा शब्द दिल्याने त्यांनी अखेर या आंदोलनाची माघार केली आहे.

    दरम्यान घटनेनंतर जवळपास पाच ते सहा तासानंतर शिर्डी पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मोलाची भूमिका घेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,बांधकाम आधिकारी यांच्याशी चर्चा करत मयताच्या कुटुंबीयांना समाधानकारक आर्थिक मदत देण्याचे आश्वासन तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.दरम्यान या घटनेनंतर कोपरगाव शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close