अपघात
अज्ञात वाहनाची धडक,एक ठार,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द शिवारात शिर्डी-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने नुकत्याच दिलेल्या धडकेत एक इसम अनोळखी इसम (वय-६०) ठार झाला असून या प्रकरणी वैभव परशराम कापसे (वय-२८) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हे कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील रहिवासी असून त्यांच्या गावातून नव्याने तयार झालेल्या शिर्डी मार्गे अ.नगर-सिन्नर हा रस्ता केंद्रीय रस्ते विकास निधीतून चार पदरी तयार झाला असून त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.अशीच घटना नुकतीच मढी खुर्द शिवारात कोल्हे वस्तीजवळ दि.०७ सप्टेंबर रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास घडली असून त्यात नावगाव माहिती नसलेला एक साठ वर्षाचा अनोळखी इसम ठार झाला आहे.त्यात जखमी इसमास आरोपी चालक हा दवाखान्यात घेऊन न जाता फरार झाला आहे.त्यामुळे मढी खुर्द आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी आधी कोपरगाव तालुका पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यु नोंद क्रं.६०/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये नोंद केली होती.तथापि या प्रकरणी फिर्यादी रुग्णवाहिका चालक यांनी त्यात रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर हे करत आहेत.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४३७/२०२३ भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४(अ)(ब)१७७ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करत आहेत.