अपघात
विद्युत वाहक तारांचा स्फोट,झाड जळून खाक,कोपरगावातील घटना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गवारेनगर येथील साई यमुना प्लाझाच्या समोर के.व्ही.ए.ची विद्युत वाहक तार तुटून पूर्ण झाड जाळून खाक झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.मात्र या ठिकाणी महावितरण कंपनीने प्रतिबंधात्मक उपाय करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
“महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या विद्युत वाहक तारांची उंची खूपच खाली असून त्याची वेळेवर देखभाल करणे गरजेचे आहे मात्र महावितरण कंपनीचे हे रडगाणे शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या मुळावर उठताना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दि.०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती.त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.त्यानंतर आता पुन्हा गवारे नगर येथे अशीच घटना घडून आली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या विद्युत वाहक तारांची उंची खूपच खाली असून त्याची वेळेवर देखभाल करणे गरजेचे आहे मात्र महावितरण कंपनीचे हे रडगाणे शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या मुळावर उठताना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दि.०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती.त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.मात्र शहर आणि तालुक्यातील अग्निशामक बंबानी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला होता.त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही बोध घेतला नाही असे दिसून येत आहे अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरातील गवारेनगर येथे ‘साई यमुना प्लाझा’ येथे घडली आहे.त्यामुळे नजीकच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर ठिकाणी झाडाला फांदी अडकून झाडाला आग लागली होती.व त्या नंतर बराच वेळ हा खेळ सुरु राहिला व नंतर सदर विद्युत वाहक तार तुटून मोठा स्फोट झाला होता.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र याबाबत काही नागरिकांनी त्या घटनेची खबर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कळवली होती.त्यांनी आपले कर्मचारी पाठवून त्या ठिकाणी विद्युत वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या तारा तोडून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नागरिक अथवा बालक हजर नव्हते त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.त्यामुळे महावितरण कंपनीने शहरातील विविध ठिकाणी धोकादायक तारा काढून टाकून त्या ठिकाणी नवीन तारा टाकून द्याव्या व पूर्वी सन-२०१३ साली कोपरगाव शहरात तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंजूर केलेल्या भूमिगत वीज वाहक केबलचे काम पूर्ण करावे व वरील धोकादायक तारांपासून शहर सुरक्षित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.