जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या पतसंस्थेच्या ठेवी,कर्ज वाटपात मोठी वाढ-…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगावसह राज्यात सहकारात अग्रणी असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिमाही आर्थिक स्थितीचा आढावा नुकताच संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जाहीर केला असून यावेळी संस्थेच्या ठेवीत तीन महिन्यात ४१ कोटी २५ लाख रुपयांची तर एकूण कर्ज वाटपात ८०९ कोटी ७९ लाख इतकी वाढ झाली असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप कायटे यांनी दिली आहे.


दरम्यान गत तीन महिन्यात झालेल्या एकूण कर्ज वाटपापैकी ५४३ कोटी,म्हणजे ६७ टक्के कर्ज सोनेतारण स्वरूपातील असून,एकूण सोनेतारण कर्ज वाटपात गत तीन महिन्यात ४४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढ झाली आहे”-संदीप कोयटे,संचालक समता नागरी सहकारी पतसंस्था,कोपरगाव.

   समता सहकारी पतसंस्थेची एक बैठक नुकतीच संपन्न झाली आहे त्यात गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत संस्थेच्या ठेवीचा आढावा घेण्यात आला आहे.यात तब्बल १४ टक्के वाढ म्हणजे ३६ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ झाली असून १०७३ कोटी २४ लाख इतक्या ठेवी झाल्याची माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली.या ठेवीत झालेल्या या भरीव वाढीबरोबरच एकूण कर्ज वाटपामध्ये तीन महिन्यात ४१ कोटी २५ लाख रुपयांची वाढ झाली असून,संस्थेचे  एकूण कर्ज वाटप ८०९ कोटी ७९ लाख इतके झाले आहे.

   दरम्यान गत तीन महिन्यात झालेल्या एकूण कर्ज वाटपापैकी ५४३ कोटी,म्हणजे ६७ टक्के कर्ज सोनेतारण स्वरूपातील असून,एकूण सोनेतारण कर्ज वाटपात गत तीन महिन्यात ४४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढ झाली आहे.”सोनेतारण कर्ज हे जगातील सर्वात सुरक्षित कर्ज समजले जाते.तसेच संस्थेची विविध बँकांमधील गुंतवणूक २५७ कोटी ३८ लाख इतक्या रुपयांची असून मोबाईल बँकिंग,पेपरलेस बँकिंग,ऑडिट कंट्रोल रूम,सेल्फ बँकिंग प्रणाली,व्हाउचरलेस प्रणाली या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे संस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.८८ ठेवीदारांच्या ५० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत.

   दरम्यान यात समता पतसंस्थेचे सोनेतारण कर्ज व्यवस्थापन हे ‘सुधन गोल्ड लोन’ या कंपनीमार्फत करण्यात येत असल्यामुळे या कर्ज प्रकारात सुरक्षिततेचा उच्च दर्जा प्राप्त झाला आहे.सुरक्षित कर्ज वाटप,कायदेशीर व कठोर वसुली व्यवस्था,तसेच सभासद व ठेवीदारांप्रती असलेली पारदर्शकता यामुळे समता पतसंस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस बळकट होत असून संस्थेचे सभासद,ग्राहकांसाठी नव्याने ‘सहकार बास्केट’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

   दरम्यान या आर्थिक प्रगतीबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल,संस्थेचे जेष्ठ संचालक जितूभाई शहा,जनरल मॅनेजर सचिन भट्टड,सर्व सभासद,ठेवीदार आणि कर्जदारांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close