जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

गोदावरी कालव्यास तातडीने पाणी सोडा-शेतकरी कृती समिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नुकतीच गोदावरी डाव्या कालव्यावर नव्याने सुरू असणाऱ्या बांधकामास भेट दिली असता सदर काम येत्या ०४ ते ०५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार असल्याने सदर कालव्यास रब्बीचे दुसरे आवर्तन येत्या ०६ ते ०७ फेब्रुवारीच्या दरम्यान सोडावे अशी महत्वपूर्ण मागणी नाशिक पाटबंधारे विभागाकडे नुकतीच केली आहे त्याचे कोपरगाव,राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.

“नाशिक जलसंपदा विभागाने सुरु असलेली कामे आगामी २० फेब्रुवारी रोजी पूर्ण होतील असे सांगितले असता कोपरगाव शेतकरी समितीने समक्ष भेट दिली होती.सदर काम आगामी ०४ ते ०५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होऊन कालव्यास त्यानंतर लगेच पाणी सोडणे शक्य होणार असल्याने सदर आवर्तन दि.०६-०७ फेब्रुवारी सोडावे”-प्रवीण शिंदे,शेतकरी कृती समिती,कोपरगाव तालुका.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”गोदावरी कालव्यास गत दि.१० डिसेंबर रोजी रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते.रब्बीचे पहिले आवर्तन हे साधारणतः नोव्हेंबर मध्ये मिळणे अपेक्षित असताना ते मात्र डिसेंबरच्या मध्यवर्ती सोडण्यात आले त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन जलसंपदा विभागाची अवस्था,”बैल गेला आणि झोपा केला” अशी झाली होती.त्याचे कारण त्या दरम्यान गोदावरी कालव्याचे पाणी वेळेवर मिळण्याची शाश्वती नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या रब्बीच्या पिकाची नियोजन केले नव्हते व पाणी उशिरा मिळणार असल्याने आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याने जी काही उभी पिके होती तिचे पाणी भरणे उरकून घेतले होते तर काही शेतकऱ्यांनी उशिराने रब्बी पिकाची पेरणी केली होती.

दरम्यान  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी पाऊस झाल्याने गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील विहिरीची भूजल पातळी खोल गेली होती.तर काही ठिकाणी विहिरी अक्षरशः कोरड्या पडलेल्या आहेत व रब्बी हंगामातील उभ्या बारमाही पिकांना आज खरी पाण्याची आवश्यकता असताना ते देणे शक्य होत नाही.त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा संताप आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका कृती समिती जागृत झाली असून त्यांनी यावेळी सजगता दाखवली आहे.व नाशिक जलसंपदा विभाग यांना कोपरगाव शेतकरी कृती समितीने दि.१८ जानेवारी रोजी एक पत्र दिले होते.त्यावेळी नाशिक पाटबंधारे विभाग यांनी त्यांना याबाबत उलट टपाली उत्तर पाठवले होते.त्यात त्यांनी नमूद केले होते की,”गोदावरी डाव्या कालव्यावर वर्तमानात नवीन बांधकामाचे काम सुरू असून व ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण होतील व त्यानंतरच गोदावरी डाव्या कालव्यास फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात रब्बीचे दुसरे आवर्तन सोडण्यात येईल.त्याबाबत समितीने पाठपुरावा सुरु ठेवला होता.


     सदर पत्राच्या अनुषंगाने कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने गोदावरी डाव्या कालव्यावर सुरू असणारे नवीन बांधकामाच्या ठिकाणी दि.२९ जानेवारी  रोजी समक्ष भेट देऊन सुरू कामाची प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असून त्यांना सदरचे काम हे येत्या ०४ ते ०५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होऊन कालव्यास त्यानंतर लगेच पाणी सोडणे शक्य होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   त्यामुळे त्यांनी जलसंपदा विभागाला आगामी ०६ ते ०७ फेब्रुवारी च्या दरम्यान शेतीच्या सिंचनासाठी रब्बीसाठीचे दुसरे आवर्तन सोडावे अशी मागणी केली आहे.अगोदरच रब्बीच्या आवर्तनासाठी झालेला उशीर विचारात व पिकांसाठी आवश्यक असणारी पाण्याची गरज लक्षात घेता बिगर सिंचन व सिंचन हे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने याआधी केलेल्या मागणीप्रमाणे व मागील रब्बी क्रमांक एकच्या आवर्तनाप्रमाणे दोन्ही एकाच वेळेस सुरू करावे परिणामी गोदावरी कालवा लाभधारक शेतकऱ्यांना रब्बीसाठीचे पाणी त्यांच्या उभ्या पिकाला वेळेवर मिळेल व लाभधारक शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशी महत्वपूर्ण मागणी नाशिक पाटबंधारे विभागाला नुकतीच केली आहे.

दरम्यान सदर निवेदनावर शेतकरी समितीचे कार्यकर्ते तुषार चारुचंद्र विद्वांस,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,प्रवीण शिंदे,संतोष गंगवाल,विकास आढाव,सदाशिव रासकर,अनिल शेवते,नरेंद्र गिरमे आदींच्या सह्या आहेत.याबाबत कोपरगाव,राहाता ता लुक्यातील शेतकऱ्यांनी कोपरगाव तालुका कृती समितीचे जोरदार स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close