कोपरगाव तालुका
टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांची फुलशेती धोक्यात ?

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना विषाणूमुळे सर्वात पहिल्यांदा २२ मार्चला सरकारने जनता टाळेबंदी जाहीर केली त्यानंतर हि टाळेबंदी २४ मार्चला तीन आठवड्यासाठी कायम केली,त्याची मुदत पुन्हा वाढविण्यात अली असून या टाळेबंदीचा प्रतिकूल परिणाम कृषी क्षेत्रावर झाला असून सरकारने तिर्थक्षेत्रे सक्तीने बंद केल्याने उत्पादित फुल पिकांना बाजारच उपलब्ध नसल्याने राज्यासह कोपरगाव तालुक्यातील फुलशेतीची रया गेल्याने शेतकऱ्यांना हि फुले अक्षरशः फेकून देण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.
सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.मात्र या पलीकडे शेतीक्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून हाती आलेले रब्बी पिके,फळपिके,भाजीपाला,द्राक्षे,फुलशेती आदींना ग्रहण लागले आहे.व्यापारी टाळेबंदीच्या नावाखाली शेतकऱ्याकडून स्वस्तात माल घेतात व ग्राहकाला टंचाई दाखवून मालामाल होत आहेत.फुलशेतीची तीच बोंब झाली असून फुलांना तर व्यापारी व ग्राहक दोघेही भेटायला तयार नाही याबाबत सरकार कानाडोळा करत आहेत तर कोणीही राजकीय नेते बोलायला तयार नाही.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४२७ ने वाढून ती १८ हजार ९७० इतकी झाली असून ६०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार ६६६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.मात्र या पलीकडे शेतीक्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून हाती आलेले रब्बी पिके,फळपिके,भाजीपाला,द्राक्षे,फुलशेती आदींना ग्रहण लागले आहे.व्यापारी टाळेबंदीच्या नावाखाली शेतकऱ्याकडून स्वस्तात माल घेतात व ग्राहकाला टंचाई दाखवून मालामाल होत आहेत.फुलशेतीची तीच बोंब झाली असून फुलांना तर व्यापारी व ग्राहक दोघेही भेटायला तयार नाही याबाबत सरकार कानाडोळा करत आहेत तर कोणीही राजकीय नेते बोलायला तयार नाही.शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा बाका प्रसंग निर्माण झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील शेतकरी येथील सुनिल दौलत वक्ते हे अनेक वर्षा पासून फुल शेती करतात. त्यांच्या शेतात वर्षातील बाराही महिने फुल शेती करण्यात येते.पण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या फुल शेतीवर झाला आहे. सुनिल वक्ते इतर पिकांबरोबरच फुल शेती करतात. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी त्यांची पत्नी कविता वक्ते या त्यांना मदत करत आहे.हे कुटुंब दोन एकराची शेती करते.त्यांना रोजच्या रोज त्यांना नगदी पैसे मिळत होते.त्यांच्या शेतात गलांडा, झेंडू्,बिजली,या जातीचे फुलांची लागवड असते.ते दररोज दुचाकीने आपला माल घेऊन शिर्डी व कोपरगावात घेऊन जात. फुले हे मोठ्या प्रमाणात धार्मिक कारणासाठी वापरली जात मात्र टाळेबंदीमुळे त्याला ग्राहक मिळणे दुरापास्त झाले आहे.फुले हे नाशवंत आहे.वर्तमानात वक्ते यांना हि फुले तोडून फेकून द्यावी लागत आहे.त्यामुळे मजूरांचा पगार कसा करावा ही एक अडचण निर्माण झाली आहे. या फुलांना ठिबंक सिंचनाने पाणी देण्यात येते.पावसाळ्यात निसर्गाची साथ असते परंतु उन्हाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात फुलांना पाणी द्यावे लागते. त्यानीं आधुनिक शेतीसाठी ठिबंक सिंचनाचा वापर केला आहे.ठिबंक सिंचनाचा खर्च,मजूरांचा पगार करणे हे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.त्यामुळे सरकारने औद्योगिक क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्राच्या नुकसानीचा विचार करणे गरजेचे आहे.