जलसंपदा विभाग
निळवंडे वितरण व्यवस्थेसाठी मोठा निधी – खा.वाकचौरे

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
निळवंडे धरणाच्या कालव्यांचे व पोट कालव्यांची अस्तरीकरणाची कामे अद्याप पूर्ण झाली नसताना व त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे असताना दिल्लीत शिर्डीचे दुसऱ्यांदा महाघाडीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीत जून 2024 मध्ये केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते त्याला गोड फळ आले असून केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी.आर.पाटील यांनी नाबार्ड बँकेकडून 800 कोटींची आर्थिक तरतूद केली असल्याची माहिती खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीने याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

“गेली अनेक वर्षे निळवंडेचे पाणी चोरी करणारी व 54 वर्ष शुक्राचार्यांची भूमिका निभावनारी हीच मंडळी आगामी विधानसभा निवडणूक पाहून शिरजोरी करून निधी आणल्याचा आव आणत आहे हे सामान्य शेतकऱ्यांना माहीत आहेत.त्यामुळे हा बेगडी प्रेमाला दुष्काळी शेतकरी भुलणार नाही”- मच्छिंद्र दिघे,कार्याध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटले आहे.दरम्यान हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला आहे.
दरम्यान यात प्रारंभी पासून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कालवा कृती समितीने न्यायीक व आंदोलनात्मक पण महत्वाची भूमिका निभावली असल्याचे दिसून आले आहे.खा.वाकचौरे यांनी समितीला केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता मिळवून देण्यात २०१४ पूर्वी अहंम भूमिका निभावली होती.त्यामुळे पुढील ०३ मान्यता उच्च न्यायालयातून मिळविण्यात ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून समितीचे याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,विक्रांत रूपेंद्र काले आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.

प्रवरा काठच्या याच नेत्यांनी आपल्या दारू कारखान्यासाठी निळवंडे धरणाचे पाणी चोरले होते.याशिवाय निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या शहरांना पाणी देण्याचा घाट घातला होता.आज हीच नितिशून्य मंडळी स्वतःला जलनायक,जलदुत म्हणून स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेऊन स्वतःचे हसे करून घेत आहे.
दरम्यान केवळ श्रेय घेण्यात पटाईत असलेल्या व पाणी पळविण्यात महिर असलेल्या व शेतकऱ्यावर 10 ऑगस्ट 2014 रोजी खडकेवाके या ठिकाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभेत निळवंडे कालव्याचे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यावर लाठी हल्ला करणारी उत्तर नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याने गतवर्षी आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे त्याचे श्रेय लाटण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला मात्र तो लोकसभा निवडणुकीत निळवंडे लाभक्षेत्रातील मतदारांनी हाणून पाडला आहे.
या प्रकल्पास 54 वर्ष उलटली आहे हे वर्तमान मंत्री आणि उत्तर नगर जिल्ह्यातील पाणी चोर मंत्र्यांचे फळ मानले जात आहे.मात्र यासाठी सातत्याने कागदपत्रीय व उच्च न्यायालयात पाठपुरावा करून मागील वर्षी ३१ मे २०२३ रोजी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना जलपूजन करण्यात भाग पाडले होते.या प्रकल्पाच्या बंदिस्त चाऱ्यांच्या निविदा मागील महिन्यात प्रसिद्ध झाल्या असून त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे.तरीही या प्रकल्पाचे अनेक कामे बाकी असताना स्थानिक उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांनी केंद्र व राज्य पातळीवरील बड्या नेत्यांची दिशाभूल करून तीन पिढ्या या प्रकल्पास विरोध करून स्वतःची जलपूजनाची हौस भागवून घेतली आहे.लोकसभा निवडणूक लढवली होती.मात्र त्यांना दक्षिण आणि उत्तर अ.नगर जिल्ह्यात तोंडघशी पडण्याची वेळ आली होती.प्रवरा काठच्या याच नेत्यांनी आपल्या दारू कारखान्यासाठी निळवंडे धरणाचे पाणी चोरले होते.याशिवाय निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या शहरांना पाणी देण्याचा घाट घातला होता.आज हीच नितिशून्य मंडळी स्वतःला जलनायक,जलदुत म्हणून स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेऊन स्वतःचे हसे करून घेत आहे.ही बाब समितीने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती.त्यावर गतवर्षी 18 जानेवारी 2013 रोजी उच्च न्यायालयाने,” या प्रकल्पात कोणी कितीही उच्च पदस्थ असो त्याने या प्रकल्पात लुडबुड केली तर त्याचा मुलाहिजा बाळगणार नसल्या”चा सज्जड दम भरला होता.

“नाबार्डच्या केंद्रीय समितीने गत चार महिन्यापूर्वी निळवंडे प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली होती.त्यानंतर हा नाबार्ड अंतर्गत 800 कोटींचा निधी दिला आहे.त्यामुळे निळवंडे प्रकल्पास आता निधीची चणचण भासणार नाही व कालव्यांच्या अस्तरीकरणासह नलिका वितरण व्यवस्था (पी.डी.एन.) पूर्ण होण्यास मदत होणार आहे”- बाळासाहेब शेटे,अधीक्षक अभियंता,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अ.नगर.
दरम्यान लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नव्याने शपथविधी संपन्न झाल्या-झाल्या हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी कालवा कृती समितीच्या पाठपुराव्याने केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेऊन या प्रकल्पाची सद्यस्थिती लक्षात आणून दिली होती व या प्रकल्पाच्या बंदिस्त वितरिकाना निधीची मागणी केली होती.त्यानुसार केंद्रीय मंत्री यांनी त्या निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती खा.वाकचौरे यांनी दिली आहे.
मात्र आज गेली अनेक वर्षे निळवंडेचे पाणी चोरी करणारी व 54 वर्ष शुक्राचार्यांची भूमिका निभावनारी हीच मंडळी आगामी विधानसभा निवडणूक पाहून शिरजोरी करून निधी आणल्याचा आव आणत आहे.हे सामान्य शेतकऱ्यांना माहीत आहेत.त्यामुळे हा बेगडी प्रेमाला दुष्काळी शेतकरी भुलणार नाही असा विश्वास समितीचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे यांनी व्यक्त केला आहे.
या निधी बाबत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,नानासाहेब गाढवे,माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,पाट पाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे,माजी अध्यक्ष गंगाधर गमे,कालवा समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,सचिव गव्हाणे,सौरभ शेळके,राजेंद्र निर्मळ,सोन्याबापू उऱ्हे,डी.एम.चौधरी,ज्ञानदेव पाटील हारदे,रमेश दिघे,उत्तमराव जोंधळे,सोमनाथ दरंदले,कौसर सय्यद,अप्पासाहेब कोल्हे,ऍड.योगेश खालकर,रंगनाथ गव्हाणे,रावसाहेब मासाळ,रामनाथ पाडेकर,माणिक दिघे,दौलत दिघे,अशोक गांडोळे,भिवराज शिंदे,वसंत थोरात,उत्तमराव थोरात,विठ्ठलराव देशमुख,संदेश देशमुख,वाल्मिक नेहे,बाळासाहेब सोनवणे आदींसह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.