निवड
जिल्हा अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यात अभियंत्यांच्या न्याय हक्कासाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अहिल्यानगर अभियंता संघनेच्या जिल्हा अध्यक्षपदी कनिष्ठ अभियंता राजू ठकाजी दिघे यांची तर सचिवपदी अभिमन्यू शिरसागर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिघे यांचा सत्कार करताना मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत भंडारी दिसत आहेत.
दरम्यान कोपरगाव येथील पदाधिकारी पुढील प्रमाणे अंजली वाघ,अश्विन वाघ आदींचा समावेश आहे.तर राहता तालुक्यासाठी-प्रदिप प्रशांत जगताप,श्रीरामपूर ठाकरे,संगमनेर दिनेश बंद,तृप्ती गाडेकर आदींचे नामांकन जाहीर केले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान राजू दिघे यांनी आपल्या अन्य पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली ती पुढील प्रमाणे उपाध्यक्ष सचिन दिनकर (दक्षिण विभाग),रविंद्र गिते (उत्तर विभाग),कार्याध्यक्ष गणेश सवाई, खजिनदार शिवाजी महांडुळे,सहसचिव योगेश डेरे,संतोष शेळके,जिल्हा संघटक जावेद पठाण,हासे मिनाक्षी,रेश्मा नागपूरे,शैलेश पांढरे,राम राजळे,महेश पालवे,गणेश खेडकर,बेळगे रविंद्र.सल्लागार किरण साळवे,पढे जयेंद्र,माने विठ्ठल,अशोक पाटील,अनिल सानप.तालुका संघटक मुख्यालय मंजिरी सुरवसे,किशोर गुंजाळ आदींचा समावेश आहे.

तर कोपरगाव येथील पदाधिकारी पुढील प्रमाणे अंजली वाघ,अश्विन वाघ आदींचा समावेश आहे.तर राहता तालुक्यासाठी-प्रदिप प्रशांत जगताप,श्रीरामपूर ठाकरे,संगमनेर दिनेश बंद,तृप्ती गाडेकर आदींचे नामांकन जाहीर केले आहे.

या शिवाय राहुरी तालुक्यासाठी मानकर नितीन आदींचा सन्मान केला आहे.या शिवाय नेवासा तालुक्यातील विशाल तागड,पारनेर तालुक्यातील प्रशांत उपाध्ये,सुरज नाझकर, श्रीगोंदा तालुका सुताळ,नगर तालुका आंबेडकर,पुजा पवार,पाथर्डी अभिजीत घुगे,शेवगाव तालुक्यातील अभिजित वावरे, कर्जत तालुक्यातील अक्षय मेहेत्रे,जामखेड तालुक्यातील मंगेश लीमजे, अकोले तालुक्यातील सचिन सांगळे,माधुरी कासार आदीची निवड घोषित केली आहे.

दरम्यान यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी संजय खेले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.यावेळी सर्व अभियंता बांधव उपस्थित होते.प्रस्ताविक मयुर मुनात यांनी केले तर शिवाजी महांडुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.
दरम्यान जिल्हा संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिघे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत भंडारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुळीक आदींनी केला असून नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिघे यांच्या निवडीचे कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,उपअभियंता दळवी,जलजीवनचे उपअभियंता सी डी.लाटे,राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघेरे, पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,बबन वाघमोडे,उपअभियंता अश्विन वाघ आदींनी अभिनंदन केले आहे.