जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गणेशच्या मैदानात उतरावे लागले-खुलासा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(प्रतिनिधी)

   उत्तर नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांना ऊस भावाबाबद न्याय देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरावे लागले असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी वाकडी येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.


“शेतकरी संघटना ज्या कारखान्यांत शेतकऱ्यांवर अन्याय होईल त्या शेतकऱ्यांच्या मागे उभी राहील.कारखान्याच्या सीमा वादात अडकणार नाही.आगामी काळात त्यांना न्याय देईल शेतकरी संघटना लढून मरणारी आहे झिजून नाही.या युती-आघाडी खिचडीत संघटनेला रस नाही”-ऍड.अजित काळे,शेतकरी संघटना.

“शेतकरी संघटना ही अद्याप संस्थात्मक लढाई करत असून तुम्ही आम्हाला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला वैयक्तीक पातळीवर छेडले तर आम्हाला त्याच पातळीवर उतरावे लागेल असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी दिला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक संपन्न होत असून याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे.हा सामना तिरंगी होत असून यात राज्याचे महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचा जनसेवा,माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गटाचा गणेश परिवर्तन मंडळाचे विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी दंड थोपटले आहे.शेतकरी संघटनेचे ०७ उमेदवारांचा पॅनल रिंगणात आहे.तर कोल्हे गटाच्या एका उमेदवारांची वेळेत माघार न झाल्याने तो उमेद्वारही अपक्ष म्हणुन रिंगणात आहे.१९ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.त्यासाठी विविध गटांनी आपला प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे.शेतकरी संघटना या बाबत आघाडीवर असल्याचे दिसून येत असून आज सायंकाळी ०६ वाजता वाकडी येथील श्री क्षेत्र वाकडी येथील खंडोबा मंदिरात आज प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.


सदर प्रसंगी कामगार नेते रमेश देशमुख,
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे,जिल्हा संघटक शिवाजी जवरे,राज्य सचिव रुपेंद्र काले,विलास कदम,निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे,शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे,राहाता शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश मोरे,श्रीरामपूर तालुका युवराज जगताप,जेष्ठ कार्यकर्ते सुदामराव औताडे,नानासाहेब गाढवे,नारायण भुजबळ,बापूसाहेब धनवटे,सतीश मोरे,भाऊसाहेब शिंदे,भगवंता मासाळ,संजय जगताप,हौशीराम चोळके रामकृष्ण बोरकर,नारायण भुजबळ,बापूसाहेब धनवटे,नानासाहेब गाढवे,भगवंत मसाळ,
आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थानी गजाबापू फोफसे हे होते.

त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,”प्रवरेचा गैरव्यवहार उघडकीस आणला तेंव्हा काहींना उकळ्या फुटत होत्या मात्र ते त्यांचेच भाऊबंध असल्याचे उघड झाले आहे.मात्र शेतकरी संघटना ही कोणाचे हत्यार नाही.शेतकरी हितासाठी शेतकरी संघटना रणात उतरते आहे.शेतकरी संघटना पहिल्यांदा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला विखेसाठी ही निवडणूक लढवत आहे.गणेश वाचविण्यासाठी लढवत आहे ती तत्वासाठी लढवत आहे.शेतकऱ्यांना ऊसाचा भाव मिळाला पाहिजे,कामगारांना पगार वेळेवर मिळाला पाहिजे,कारखाना लूट थांबली पाहिजे या साठी लढवत आहोत.काही नेत्यांनी गळ घालून आ.बाळासाहेब थोरात यांचेकडे नेण्याचा प्रयत्न केला व गळ्यात दोर बांधण्याचा प्रयत्न केला आपण त्यास बधलो नाही.माजी आ.कोल्हेना चेव आला व ते निवडनुकीत उतरले असल्याचा आरोप केला आहे.गणेश कारखाण्याचा करार होणार हे आपल्याला माहीत होती.थोरात गटास उशिरा माहीत झाले.साखर आयुक्त सेवानिवृत्त होताना ते निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले त्यांनी केले होते.त्या प्रमाणेच झाले आहे.आम्हीच आधी विरोध केला हे नंतर गर्दीत सामील झाले आहे.गणेश कारखान्यावर आंदोलन केल्यावर व वातावरण तयार झाल्यावर शेतकरी संघटना वापरण्याचा निर्णय या लोकांच्या मनात घोळत होते.त्यांना वाटते आमच्या मागे मतदान नाही.पण अशोक कारखाना, श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीत केवळ एक सोसायटी असताना किती मते मिळाली याचा इतिहास तपासा असे आवाहन केले आहे.यांच्या तीन पिढ्या राजकारणात असताना शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही.मग तुमची सत्ता काय कामाची तुम्ही शेतकऱ्यास भाव मिळून देत नाही.असा हल्ला केला आहे.काटेमारी करणाऱ्यांची काय उंची असू शकते.३७ कोटींचा तोटा असताना दुसऱ्याच्या हवाली करता ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले आहे.याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने उशीर झाल्याचे सांगितले पण करार संपल्यावर पुढील निर्देश देता येईल असे सांगितले आहे.कारखान्यांचे आरोग्य तपासून पुढील वाढीव करार करण्याचं सांगितले असताना त्यास साखर आयुक्तांनी विश्वासघात केला आहे.कोरोना नसताना कुठली आपत्ती नसताना साखर आयुक्त असा निर्णय कसे घेऊ शकतात. यांचा बेत पाहण्यासाठी तुम्ही केवळ आमचे सात उमेदवार निवडून दिले तरी शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो.असा विश्वास शेतकऱ्यांना दिला आहे.थोरात गटाने शेतकरी संघटनेकडे मते नाही असा भ्रम करुन घेतला आहे.त्याला आगामी १७ जून रोजी शेतकरी सभासद हे “ऊसधारक शेतकरी” हे चिन्ह असलेल्या चिन्हास मत देऊन उत्तरे देतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी अनिल औताडे यांनी कारखाना तोट्यात कसा जातो असा सवाल करून एकत्रित शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याचे आदेश रद्द करून शेतकऱ्यांना न्याय दिला,छ.शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमाफी योजना जाहीर करून ती ऐन वेळी बंद केली होती व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवले होते.मात्र शेतकरी संघटनेच्या वतीने ऍड.अजित काळे यांनी जनहित याचिका दाखल करून राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे ०५ हजार ९७५ कोटी कर्ज माफीचा शेतकऱ्याना लाभ मिळवून दिला आहे असल्याचे सांगून गणेश कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्याचे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक विलास कदम यांनी केले आहे तर उपस्थितांना मार्गदर्शन निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांचेसह सुभाष जाधव,
सुदामराव औताडे,रुपेंद्र काले,शिवाजी जवरे,नानासाहेब जवरे,संभाजी ब्रिगेडचे दशरथ गव्हाणे आदींनी केले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक विलास कदम यांनी केले आहे.उमेदवारांचा परिचय कामगार नेते रमेश देशमुख यांनी करून दिला आहे.तर सूत्रसंचालन विलास कदम यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार नानासाहेब गाढवे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close