जाहिरात-9423439946
दळणवळण

झगडे फाटा ते वडगांव पान फाटा…या महामार्गाकडे वर्ग करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर भारतीयांना पुण्याकडे जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा कोपरगांव विधानसभा मतदार संघातील झगडे फाटा ते वडगांव पान फाटा हा राज्यमार्ग ६५ राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्याकडे नुकतीच केली आहे.

कोपरगांव विधानसभा मतदार झगडे फाटा ते वडगांव पान फाटा हा राज्यमार्ग ६५ जवळपास ३४.२०० कि.मी.लांबीच्या रस्त्याचा विकास होण्यासाठी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करावा अशा मागणीचे निवेदन आ.काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांना दिले आहे.

तळेगाव दिघे मार्गे झगडेफाटा ते वडगाव पान या रस्त्यासाठी नगर येथील सार्वजनींक बांधकाम विभागाचे मंडळ अभियंता जे.डी.कुलकर्णी यांनी दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी पाहणी दौरा करून ३३ कि.मी.रस्त्यासाठी १८७.८३ कोटी रुपयांचा अहवाल तयार करून प्रकल्प संचालक आशियायी बँक सहाय्यित प्रकल्प तथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण मुंबई यांना पाठवला होता.मात्र त्यासाठी राज्याने आपला ३० टक्के हिस्सा दिला नव्हता म्हणून हा रस्ता चारपदरी व मजबुतीकरण झाला नाही.मात्र यासाठी केवळ दहा कोटींची तरतुद करून त्याचे काम नुकतेच झाले असताना तो रस्ता अद्याप पूर्ण झाला नसताना त्याची वाट लागली होती त्या बाबत जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थने व ‘न्यूजसेवा पोर्टल’ने आवाज उठवला होता.त्या पार्श्वभुमीवर हि मागणी आ.काळे यांनी रस्ते बांधकाम मंत्री चव्हाण यांचेकडे केली आहे. त्यात त्यानीही पुढे म्हटले आहे की,”झगडे फाटा ते वडगांव पान रस्त्यावर दररोज अंदाजे १ लाख ०५ हजार मेट्रिक टनापर्यंत वाहतूक होत असून दररोज १० हजार पेक्षा जास्त वाहनांची वर्दळ असते.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची नेहमीच दुरवस्था होत असते.हा मार्ग पुणे-संगमनेर ते कोपरगांव औरंगाबाद या शहरांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे.त्यामुळे अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या महामार्गाचे नियमित काम होणे गरजेचे असून हा महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करणे अत्यंत गरजचे आहे.त्यामुळे हा राज्यमार्ग ६५ झगडे फाटा ते वडगांव पान फाटा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे तातडीने वर्ग करावा अशी मागणी केली आहे. या मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी गांभिर्याने दखल घेवून तातडीने कार्यवाही करू अशी ग्वाही दिली असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close