जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

राज्याचा सर्वांगीण विकासासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज-मुख्यमंत्री

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“राज्यात अडीच वर्षे असलेल्या सरकारच्या काळात सर्व प्रकल्प बंद होते मात्र आपण सत्तेत आल्यावर त्यालना दिली असून मोठ्या प्रमाणावर नवीन प्रकल्प सुरू केले आहे.या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता दुहेरी इंजिनच्या सरकारची आवश्यकता असून आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ज्या गोष्टी मागितल्या ते देण्याचं काम केलं असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काकडी येथील विमानतळ येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत.समृद्धी,मेट्रो,३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली,ते कार्य पुढे नेत आहोत.लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम सरकार करतंय.पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाला हात लावतात,भूमिपूजन करतात तो प्रकल्प मोठ्या वेगाने पुढे जातो”-एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे,तसेच अन्य विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोपरगाव तालुक्यातील काकडी (शिर्डी) विमानतळ दौऱ्यावर आले होते.त्या निमित्ताने तेथे शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

सदर प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थ मंत्री अजित पवार,केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

      त्यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”गेल्यावर्षभरात सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्रात सहावेळा आहे.आपण पंतप्रधान यांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे हा त्यांच्या स्वभावाचा मोठेपणा आहे.म्हणून,आतापर्यंत दोन लाख कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं आहे. आजही १४ हजार कोटींपेक्षा जास्त कामांचं लोकार्पण होत आहे.

सदर प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निळवंडे प्रश्नावरून जिल्ह्यातील नेत्यांना चांगलेच शालजोडे लगावताना,“निळवंडे धरणाचा इतिहास प्रत्येकाला माहित असल्याचे सांगून त्यांच्या जन्माआधी हा प्रकल्प सुरू झालाय,परंतु,मधे काय काय झालं त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही असे म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे रोख व्यक्त केल्याचे मानले जात आहे.देवेंद्र मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला चालना दिली.या प्रकल्पामुळे ६८ हजार ८७८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे” अशी माहितीही त्यांनी आज दिली आहे.

“राज्यातील अडीच वर्षे सर्व प्रकल्प बंद होते,त्याला आपण चालना दिली आहे.नवीन प्रकल्प सुरू केले.या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता डबल इंजिनच्या सरकारची आवश्यकता असते.मोदींकडे ज्या गोष्टी मागितल्या ते देण्याचं काम केलं”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,“आपण आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघंच मंत्रिमंडळात होतो तेव्हा दुष्काळग्रस्त विभागांना,जिल्ह्यांना मराठवाडा,विदर्भात वाहून जाणारं पाणी तिथं वळवलं पाहिजे ही योजना मोठी आणली.पण योजना पूर्णत्वास नेणं राज्याच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर आहे.या योजनेला केंद्राने पाठिंबा दिला तर लाखो करोडो शेतकऱ्यांना फायदा होईल” अशी विनंतही एकनाथ शिंदे यांनी शेवटी केली आहे.

त्यावेळी त्यांनी,”गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत.समृद्धी,मेट्रो,३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली,ते कार्य पुढे नेत आहोत.लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम सरकार करतंय.पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाला हात लावतात,भूमिपूजन करतात तो प्रकल्प मोठ्या वेगाने पुढे जातो व पूर्ण होतो असा अनुभव सांगितले असून त्यांच्या हाताला यशाचा परीस असल्याचे सांगून त्यांनी हात लावताच त्याचं सोनं होतं असा अनुभव सांगितला आहे म्हणूनच आम्ही त्यांना वारंवार बोलावतो”, अशी पुष्टी त्यांनी शेवटी जोडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close