निधन वार्ता
भाऊसाहेब निंबाळकर यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय लष्करी सेवेतील सेवानिवृत्त जवान व माजी सैनिक संघटनेचे सचिव भाऊसाहेब लक्ष्मण निंबाळकर यांचे राहते घरी साईनगर येथे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.

स्व.भाऊसाहेब निंबाळकर हे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांचे मेहुणे होते.त्यांनी भारतीय लष्करामध्ये त्यांनी सुमारे बावीस वर्षे अशी प्रदीर्घ सेवा केली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,माजी शहराध्यक्ष भरत मोरे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.