विशेष दिन
…या तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी अवघा देश तिरंगी रंगात न्हावून निघाला आहे.आज देशभरातील शाळा,महाविद्यालये,शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना दिसुन आला आहे.कोपरगाव तालुक्यात तहसील कार्यालयात,कोपरगाव नगरपरिषद,कोपरगाव पंचायत समिती,शहर आणि तालुका पोलिस ठाण्यासह तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती आदि ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेने या दिनाचे औचित्य साधत शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेच्या समस्या मार्गी लागण्यासाठी व शहरातील धूळ कमी करण्यासाठी अत्याधुनिक स्वीपर मशीनरी नगराध्यक्ष पराग संधान व पदाधिकारी यांचे उपस्थितीत उपलब्ध करून दिली आहे.त्यातून शहरातील धूळ कमी होऊन हवामान स्वच्छ राहील अशी अपेक्षा सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर,इ.स.१९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स.१९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स.१९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन मानला जात आहे.या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते.राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य संचलनातून देशाचे लष्करी सामर्थ्य,सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचे दर्शन झाले आहे.तर राज्यात जिल्हा,तालुका,ग्रामपंचायत पातळीवरही त्याच्या वेगवेळग्या छटा दिसून आल्या आहेत.

दरम्यान यावेळी राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिव पदी वैशाली डिगे (दामरे) यांची निवड झाल्या बद्दल आज माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला आहे.तेच बरोबर कोपरगाव पंचायत समितीत त्यांचा गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी सत्कार केला असल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तहसीलदार कार्यालयात तहसीलदार महेश सावंत यांचे हस्ते तर कोपरगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी संदीप दळवी,कोपरगाव नगरपरिषद प्रांगणात नूतन नगराध्यक्ष पराग संधान,शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,तर तालुका पोलिस ठाण्याच्या प्रांगणात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.तर तालुक्यातील ग्रामपंचायतीत सरपंच,मान्यवर कार्यकर्ते,समाजसेवक आदींच्या हस्ते हा दीन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कुठेही अनुचित प्रकार झाला असल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेने या दिनाचे औचित्य साधत शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेच्या समस्या मार्गी लागण्यासाठी व शहरातील धूळ कमी करण्यासाठी अत्याधुनिक स्वीपर मशीनरी उपलब्ध करून दिली आहे.त्यातून शहरातील धूळ कमी होऊन हवामान स्वच्छ राहील अशी अपेक्षा सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

सदर प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,आरोग्य सभापती वैभव आढाव तसेच नगरसेवक,नगरसेविका व नगरपरिषदेचे कर्मचारी,पदाधिकारी कार्यकर्ते आदी बहूसंख्येने उपस्थित होते.

कोपरगाव शहरातील माधवराव आढाव विद्यालयातील ध्वजारोहण नगराध्यक्ष पराग संधान यांचे हस्ते तर उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,मुख्याधिकारी सुहास जगताप,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले आहे.
तर कोपरगाव पंचायत समितीत ध्वजारोहण गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचे हस्ते करण्यात आले आहे.तालुका पशुवैद्यकीय अधिकारी काटे,तालुका वैद्यकीय अधिकारी त्यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,पंडित वाघेरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,बबनराव वाघमोडे,प्रशांत वाघमारे,तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रद्धा काटे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी आदींना बाल विवाह मुक्तीची शपथ देण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी ग्रामविकास विभागाच्या उपसचिव पदी वैशाली डिगे (दामरे) यांची निवड झाल्या बद्दल आज माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला आहे.तेच बरोबर कोपरगाव पंचायत समितीत त्यांचा गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी सत्कार केला असल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सुशीलमाई काळे महाविद्यालय,गौतम पब्लिक स्कुल,गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट,तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,श्री.छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात येवून आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



