जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार,एकावर गुन्हा ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
    कोपरगाव शहरातील महसूल,पोलिस,जलसंपदा,महावितरण आदी कार्यालयासह विविध कार्यालयात होणारे भ्रष्टाचार जनतेला नवे नाहीत पण आता याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात आता बाहेरील व्यक्ती भ्रष्टाचार करत असल्याचे मासलेवाईक प्रकरण समोर आले असून या प्रकरणी कोपरगाव येथील वकील दिपक सुरेश पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

“आदल्या दिवशी आपल्या अशिलाचा व्यवहार केल्यावर त्याचे कागदपत्र घेण्यासाठी ते दि.३० मे रोजी गेले असता तेथील इसम प्रफुल्ल सोमनाथ शिंगाडे याने त्यांच्याकडे १०० रुपयांची मागणी केली होती.ऍड.दिपक पवार यांनी ते देण्यास नकार दिला असता त्याने,”तुम्हाला आमचे पैसे द्यावे लागतील नाही दिले तर याचे वाईट परिणाम होतील,तुम्ही रस्त्यावर फिरता याचे भान ठेवा”असा दम भरला आहे.

  नोंदणी कायदा १९०५ अंतर्गत,जर व्यवहारात समाविष्ट असलेली रक्कम १०० रुपयांपेक्षा जास्त असेल तर मालमत्तेच्या मालकीमध्ये कोणताही बदल कायदेशीर वैधता प्राप्त करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.यामुळे जवळजवळ प्रत्येक मालमत्तेचा व्यवहार कायद्याच्या कक्षेत येतो,ज्यामुळे नोंदणी अनिवार्य होते.
नोंदणी कायद्यानुसार,इतर विविध कायद्यांच्या संबंधित तरतुदींसह,कागदपत्रांची नोंदणी करणेसह विहित मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क वसूल करणे,भारतीय मुद्रांक कायदा,१८९९ च्या कलम ४७-अ आणि ४७-२ (अ) अंतर्गत कमी मूल्यांकन मुद्रांक प्रकरणे शोधणे आणि त्यांची स्थापना करणे,भारतीय मुद्रांक कायद्याच्या तरतुदींनुसार कागदपत्रांचा निर्णय,जप्ती आणि प्रमाणीकरण,परवानाधारक दस्तलेख लेखक आणि विक्रेत्यांनी राखलेल्या रजिस्टरची नियतकालिक तपासणी आणि पडताळणी करणे, नोंदणीकृत कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती देणे,त्याच्या कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या स्थावर मालमत्तेसाठी भार प्रमाणपत्रे देणे,सर्व नोंदणीकृत कागदपत्रांच्या मूळ प्रती जतन करणे,विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहांचे समारंभ आणि नोंदणी आदी कामे केली जात असतात.काही वर्षांपूर्वी हे कोपरगाव रजिस्ट्रार कार्यालय अवैध कामासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जात होते.मात्र अलीकडील काळात बऱ्यापैकी दुय्यम निबंधक अधिकारी आल्याने या कार्यालयाची प्रतिमा बरी होती.मात्र काही वर्षांपूर्वी काही कनिष्ठ कर्मचारी या कार्यालयास बदनाम करताना दिसून आले होते.मध्यंतरी यात खंड पडला होता.मात्र बदनाम कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आता यात सक्रिय झाले असून ते त्यांचा वारसा पुढे चालवताना दिसत आहे.त्यामुळे या कार्यालयाची बदनामी होताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच घडली  आहे.

  

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे यांना समक्ष भेटून निवेदन दिले तो क्षण.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत कोपरगाव येथील दुय्यम निबंधक कुसाळ कर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना कार्यालयात झालेली नाही ती बाहेर झाली असावी त्यामुळे त्याबाबत आपल्याला जास्त माहिती नाही असा बचाव केला आहे.त्यामुळे तालुक्यात विविध तर्ककुतर्कांना उधाण आले आहे.



   यातील तक्रारदार वकील दिपक सुरेश पवार यांना याचा दाहक अनुभव नुकताच आला आहे.ते आपल्या अशिलांचे कामे नेहमी घेऊन जात असतात.मात्र दि.२९ मे रोजी त्यांनी आपल्या अशिलाचा व्यवहार केल्यावर त्याचे कागदपत्र घेण्यासाठी ते दि.३० मे २०२५ रोजी गेले असता तेथील इसम प्रफुल्ल सोमनाथ शिंगाडे याने त्यांच्याकडे १०० रुपयांची मागणी केली होती.ऍड.दिपक पवार यांनी ते देण्यास नकार दिला असता त्याने,”तुम्हाला आमचे पैसे द्यावे लागतील नाही दिले तर याचे वाईट परिणाम होतील” असा दम भरला आहे.याबाबत त्यांनी दुय्यम निबंधक श्री कुसाळकर यांबाबत तक्रार केली असता त्याने,”तुम्हाला प्रत्येक दस्ताचे पैसे द्यावेच लागतील,तुम्ही दुय्यम निबंधक यांचे पैसे देऊ नका; पण मला माझे पैसे प्रत्येक दस्ताप्रमाणे द्यावे लागतील” असे सांगितले.दरम्यान ते नाही दिले तर कसे वसूल करायचे हे मला चांगले माहिती आहे,”तुम्ही रस्त्यावर फिरता मी पण रस्त्यावर असतो” असे म्हणून मला जीवे मारण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे.सदर व्यक्ती दुय्यम निंबधक याचे कार्यालयात कोणते पदावर कार्यरत आहे हे मला माहिती नाही.मात्र या व्यक्तिपासून माझे व कुटुंबाचे जीवितास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे सदर व्यक्तीवर गुन्हा दखल करावा अशी मागणी केली आहे.निवेदनाची प्रत त्यांनी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या उपस्थितीत कोपरगाव तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे यांना समक्ष भेटून दिली आहे.  त्यांनी ठाणे अंमलदार यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.मात्र तो नोंदवला की नाही हे समजू शकले नाही.

सदर प्रसंगी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शीतल गोरे,धोंडीराम लष्करे,राम शहाणे,सुधाकर राऊत छत्रपती संभाजीनगर,अविनाश कंगरे श्रीरामपूर,शामराव घेगडमल यांचेसह निर्भय सैनिक हे उपस्थित होते.

   दरम्यान या अवैध प्रकारावर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close