जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

एकाचा मृत्यू,पोलिसांत मृत्यूची नोंद !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी बाळासाहेब शिवाजी मोरे (वय-40)आपल्या शेततळ्यात किती पाणी आले हे आज सकाळी पाहण्यासाठी गेले असता त्यांचा सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पाय घसरून मृत्यू झाला आहे.मुलांना शाळेत सोडण्याची वेळ होऊनही ते घरी परत का आले नाही. त्या वेळी त्यांचा इतर नातेवाईकांनी शोध घेतला असता शेततळ्यात त्यांच्या पाऊल खुणा आढळल्याने त्यांचा सुगावा लागला असता त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

  

  वर्तमानात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे.अनेक शेतकरी आपल्या शेतीची उद्याची रब्बी पिकांची चिंता मिटविण्यासाठी आपली शेततळी भरून घेत असून उद्याची काळजी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यातून पाऊस असल्याने पाय घसरून अपघात होत आहे.अशीच घटना आज सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव शिवारात चारी क्रमांक 36 नजीक घडली आहे.सदर मयत शेतकरी हे आपल्या शेततळ्यात किमी पाणी आले हे पाहण्यासाठी सकाळी 07 वाजता आपल्या शेतातील तळ्यावर गेले होते.त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा पाय घासरून ते पडले होते.त्यावेळी त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे.ही घटना घडली असता व शाळेत मुलांना सोडण्याची वेळ झाली असता अद्याप ते घरी का आले नाही ? असा प्रश्न त्यांच्या घरच्या नातेवाईकांना पाडला होता.त्यावेळी त्यांनी इतरत्र शोध घेऊन पहिला असता ते मिळून आले नाही.त्यावेळी,”ते सकाळी आपल्या शेत तळ्यावर गेल्याचे आपण पाहिले होते” असे मयताच्या चुलत्यांनी सांगितल्यावर त्या दिशेने शोध घेतला असता त्यांच्या चिखलाने माखलेल्या पाऊल खुणा आढळून आल्या होत्या.त्या ठिकाणच्या उपस्थित ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी ते तळ्यात पडल्याचा अंदाज बांधला होता.त्यानुसार त्यांनी त्यांना वर काढले असता व पुढील उपचारासाठी त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तिथे उपचार करणाऱ्या वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
त्यांच्यावर नाटेगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात आजी,आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक-51/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 194 प्रमाणे आपल्या दप्तरी नोंद दाखल केली आहे.घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close