जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवावर या वर्षीही कोरोनाचे सावट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही गुरुवार दिनांक १४ ऑक्‍टोबर ते रविवार दिनांक १७ ऑक्‍टोबर २०२१ या कालावधीत श्री साईबाबांची १०३ वा श्रींचा पुण्‍यतिथी उत्सव प्रतिकात्‍मक स्‍वरुपात साजरा करण्‍यात येत आहे.मात्र कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर याही वर्षीचा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार असल्याने साई भक्तात नाराजी आहे.

शुक्रवार दि.१५ ऑक्‍टोबर हा शिर्डीतील श्री साईबाबांच्या पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०५.१५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ०८.३० वाजता लेंडीबागेत शताब्‍दी ध्‍वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात येणा-या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळीकरीता गांवकरी,साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परीसरात व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या,”यावर्षीही कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले होते. त्‍यानुसार दिनांक ०५ एप्रिल पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे काही अटी शर्तीवर खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार शासनाच्‍या मार्गदर्शन तत्‍वांवर श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. परंतु अजुन कोरोना व्‍हायरसचे सावट संपलेले नसल्‍यामुळे गुरुवार दिनांक १४ ऑक्‍टोबर ते रविवार दिनांक १७ ऑक्‍टोबर याकालावधीत साजरा करण्‍यात येणारा श्रींचा पुण्‍यतिथी उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.तसेच श्रींचा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्‍याअनुषंगाने उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी आयोजित करण्‍यात येणा-या भिक्षाझोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२,चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तरी गांवकरी व साईभक्‍तांनी भिक्षाझोळीत दान भिक्षा देतांना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करुन भिक्षाझोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी. तसेच संस्‍थानचे संरक्षण व दान भिक्षा स्विकारणारे कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहान संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.
श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी गुरुवार दिनांक १४ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता श्रीं च्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०५.१५ वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. त्‍यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल, परंतु श्री साईसच्‍चरित अखंड पारायण श्री द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहील.
शुक्रवार, दिनांक १५ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी सकाळी ०९ ते ११.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. तर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी शनिवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती , दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजारती होणार
उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी रविवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०६.३० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजारती होणार असल्‍याचे सांगुन उत्‍सव कालावधीतील सर्व विधी मर्यादित संख्‍येने सामाजिक अंतराचे पालन करुन करण्‍यात येणार असल्‍याचे ही श्रीमती बानायत यांनी सांगितले.
हा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलिप उगले, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे प्रयत्‍नशिल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close