जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरटा मुद्देमालासह पकडला,पोलिसांची कारवाई ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीतील ऊस तोडणी कामगारांच्या कोपीतुन दि.18 ऑक्टोबर रोजी सुमारे साडे पाच हजार रुपये किमतीचे भांडे चोरी करणाऱ्या आरोपीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी 48 तासात शोध लावून त्या गुन्हयातील चोरी गेली भांडी व आरोपी किशोर भाऊसाहेब पवार यांस पोलीसांनी जेरबंद केले असून दुसरा आरोपी सुभाष छगन मोरे हा फरार झाला आहे.दरम्यान पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी किशोर पवार याला जेरबंद केले तो क्षण.

सदर गुन्हयांतील चोरुन नेलेली भांडी हि त्याचा चोरी करण्यास सोबत असणारा साथीदार सुभाष छगन मोरे रा.नांदुर मधमेश्वर पाटाचेकडेला ब्राम्हणगाव यांचे घराचेकडे जाणा-या पाठाच्या कडेला लपवुन ठेवलेले असल्याचे आढळूनआले होते.सदर ठिकाणी पोलीस पथकाने जावुन खात्री केली असता त्याने सदर गुन्हयात चोरी गेलाला घर संसार उपयोगी वस्तु असा एकुण-5 हजार 500 रुपये किंमतीची भांडी त्याने गुन्हयांचे तपासा दरम्यान काढुन दिली आहे.सदर गुन्हयातील चोरी गेलेला पुर्ण माल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर गुन्हयांतील सहआरोपी सुभाष छगन मोरे याचा शोध पोलीस पथक घेत आहे.

    वर्तमानात दुष्काळाची छाया गडद होत चालली असून त्यामुळे ग्रामीण भागासह शहर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.त्यातच 17 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे धारणगाव रोड परिसरात सकाळी 11 वाजेच्या एका कार्यक्रमात राजकीय नेते आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत चोरट्यांनी आपली हात की सफाई दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.सदर चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.मात्र काही पोलिसांच्या मते त्यांनी तो ओळखला असून त्याला लवकरच जेरबंद केले जाईल असे म्हटले जात आहे.अशातच कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ऊस तोडणी अड्डा असलेल्या कामगाराच्या कोपित ते ऊस तोडणी करण्यासाठी गेले असल्याने त्यावर पाळत ठेवत काही चोरट्यांनी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 06 वाजेच्या सुमारास त्यांच्या कोपीतील घर संसार उपयोगी वस्तु पातेले,कढई,दोन कुकर,परात,तवा,ताट,तांबे,ग्लास अशा सुमारे 05 हजार 500 रुपयांचे साहित्य पळवून नेले होते.

   दरम्यान या प्रकरणी कोपारगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.474/2026,भारतीय न्याय संहिता -2023 चे कलम-305 (अ) प्रमाणे दाखल केला होता.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस शोध घेत असताना त्यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत खबर मिळाली होती.त्यानुसार केलेल्या कारवाईत त्यांना एक चोरटा किशोर भाऊसाहेब पवार (वय-31 वर्षे) धंदा-मजुरी रा.ब्राम्हणगाव हा आढळून आला होता.त्याला तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.व त्याने सदर गुन्हयांतील चोरुन नेलेली भांडी हि त्याचा चोरी करण्यास सोबत असणारा साथीदार सुभाष छगन मोरे रा.नांदुर मधमेश्वर पाटाचेकडेला ब्राम्हणगाव यांचे घराचेकडे जाणा-या पाठाच्या कडेला लपवुन ठेवलेले असल्याचे आढळूनआले होते.सदर ठिकाणी पोलीस पथकाने जावुन खात्री केली असता त्याने सदर गुन्हयात चोरी गेलाला घर संसार उपयोगी वस्तु असा एकुण-5 हजार 500 रुपये किंमतीची भांडी त्याने गुन्हयांचे तपासा दरम्यान काढुन दिली आहे.सदर गुन्हयातील चोरी गेलेला पुर्ण माल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर गुन्हयांतील सहआरोपी सुभाष छगन मोरे याचा शोध पोलीस पथक घेत आहे.या कारवाईत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार पो.कॉ.रशीद शेख,पो.कॉ.रमेश झडे,पो.कॉ.सागर शेवाळे,फिजा पठाण आदींनी महत्वाची जबाबदारी पार पाडली असल्याचीही माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close