जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

एन.डी.ए.अकॅडमीत…या विद्यार्थ्याची निवड!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा विद्यार्थी प्रबुद्ध संजय इंगळे याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदासाठी निवड झाली आहे.या निवडीमुळे या अॅकाडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची माहिती जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.त्याच्या निवडीचे वृत्त समजताच अॅकाडमीतील अन्य विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा विद्यार्थी प्रबुद्ध संजय इंगळे.

“आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी देशप्रेमाने भारलेला असतो.शिस्त,देशप्रेम आणि कठोर परिश्रम या त्रिसुत्रीच्या आधारे येथे विद्यार्थी घडवीले जातात.प्रबुध्द इंगळे याने आपल्या यशाचे श्रेय संस्थेतील प्रशिक्षक आणि येथे मिळालेल्या देशसेवेच्या प्रेरणेला दिले आहे”-नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट.

     नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एन.डी.ए.) ही पुणे,महाराष्ट्र येथील खडकवासला येथे स्थित भारतीय सशस्त्र दलांची एक नामांकित आणि संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे.येथे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या कॅडेट्सना एकत्र प्रशिक्षण दिले जाते.या संस्थेत निवड होणे ही बाब गौरवाची मानली जात आहे.या संस्थेत नुकतीच कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालक अकादमीतील विद्यार्थी प्रबुद्ध इंगळे यांची निवड झाली आहे.त्याबाबत संस्थेने त्याचा गौरव केला आहे त्यावेळी जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी बोलत होते.

  दरम्यान या निवडीबद्दल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी प्रबुध्दच्या यापुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या आहे.या अॅकाडमीत त्याला जे प्रशिक्षण मिळाले आणि त्याने अध्यात्मिक वातावरणात जे संस्कार ग्रहण केले त्याचे हे फलीत आहे.अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे.

   दरम्यान या बाबत शिंदे म्हणाले,”आपल्या या यशामुळे अॅकाडमीतील सर्व प्रशिक्षकांच्या कष्टीचे चिज झाले आणि अन्य विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे.राष्ट्रप्रेम,शिस्त, चारित्र्य आणि सेवाभाव जपणारे जबाबदार अधिकारी तयार करणे हे संस्थेचे कठोर परिश्रम,पालकांचा विश्वास आणि संस्थेच्या प्रशिक्षकांच्या समर्पित कार्यातून प्रबुध्दची जडणघडण झाली आहे.भविष्यातही आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीमधील तरुण भारतीय सैन्यात अधिकारी या नात्याने देशसेवेसाठी जातील असा आम्हाला विश्वास वाटतो.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close