गुन्हे विषयक
आमचे घरी या…आणि चोरी करून जा…!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील शेतकरी यांचे पुरुषोत्तम भगिनाथ टूपके (वय-35)घराचे देवळीतून कडी उघडून आणि बाहेर उभ्या केलेली दुचाकीला चावी तसीच असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी काल मध्यरात्री रोख रक्कम व सोन्याचे विविध प्रकाराचे दागिने असा जवळपास 60 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे.मात्र दरवाजाजवळ असलेल्या देवळीतून कडी उघडू शकते आणि दुचाकीला चावी ठेवल्याने एका प्रकारे चोरट्यांना घर मालकाने आव्हान दिले होते.त्यामुळे एक प्रकारे घर मालकाने “आमचे घरी या आणि चोरी करून जा” असे नाक खाजवून चोरट्यांना आव्हान दिले असल्याने त्या संधीचे अचूक सोने करत साधत चोरट्यांनी आपली दिवाळी साजरी केल्याचे मानले जात आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांनी 1987 साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात चोऱ्या करण्याचे विविध तऱ्हेवाईक नमुने आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहेतच.या खेरीज आधुनिक जगात मात्र चोराला चोरी कशी करू द्यावी असेही एखादे पुस्तक आले तर किती बरे होईल अशी म्हणण्याची सांप्रत जगात वेळ आली आहे.हे सांगण्याची गरज यासाठी आली आहे की,बऱ्याच वेळेला आपण चोरट्यांना दोष देताना दिसून येतो,मात्र दक्षता घेताना दिसून येत नाही.परिणामी आता नागरिकांनी आपली चोरी कशी होऊ नये’ या साठी आता एखादे पुस्तक एखाद्या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने लिहायला हरकत नाही.
‘चोरी कशी करावी?’ हे पत्रकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं एक भन्नाट पुस्तक आहे.१९२५ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.तब्बल २० प्रकरणांच्या या पुस्तकात कोल्हटकर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या कशा कराव्यात याच्या साद्यंत हकिकत सांगितल्या आहेत.अजून काही वर्षांनी या पुस्तकाला मागील वर्षी १०० वर्षं पूर्ण झाले आहेत.पण त्याआधीच आणि नंतरही या पुस्तकाची मागणी बाजारात वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ उठवत मराठी प्रकाशकांनी या पुस्तकाची नवी सुधारित आवृत्ती तातडीने बाजारात आणण्याची गरज आहे.या शिवाय ‘ उचल्या ‘ कार लक्ष्मण गायकवाड यांनी 1987 साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात चोऱ्या करण्याचे विविध तऱ्हेवाईक नमुने आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहेतच.या खेरीज आधुनिक जगात मात्र चोराला चोरी कशी करू द्यावी असेही एखादे पुस्तक आले तर किती बरे होईल अशी म्हणण्याची सांप्रत जगात वेळ आली आहे.हे सांगण्याची गरज यासाठी आली आहे की,बऱ्याच वेळेला आपण चोरट्यांना दोष देताना दिसून येतो पण नागरिकांनी आपली चोरी कशी होऊ नये या साठी आता एखादे पुस्तक एखाद्या सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने लिहायला हरकत नाही.अधूनमधून काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला की मग त्यावर आपल्या काळ्या रंगाच्या गाडीतून खास सूचना देताना दिसून येतात.मात्र नागरिक बहुतांशी वेळा दुर्लक्ष करताना दिसून येत असतात.अलीकडील काळात चलचित्रण (सी.सी.टी.व्ही.)ही सुविधा आल्याने बऱ्याच वेळा चोरटे रंगेहात पकडले जातात.

मात्र याची आठवण येण्याचे कारण इतकेच की,कोपरगाव तालुक्यात काल दि.15 एप्रिल रोजी रात्री 09 ते पहाटे 03 वाजेच्या सुमारास फिर्यादी इसम पुरुषोत्तम टूपके हे आपली नियत कामे आटोपून झोपी गेले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचेवर पाळत ठेवून त्यांचे घरांच्या दरवाजाजवळ असलेल्या देवळीतून दाराची कडी सहज उघडू शकते याचे निरीक्षण केले असल्याची दाट शक्यता आहे.त्यातले त्यात घर मालकांचा भोंगळ कारभार त्यांचे लक्षात आला असावा.त्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीला असलेले चावी तशीच ठेवून ते झोपी गेले होते.शिवाय दरवाजापाशी असलेले देवळीत हात घातला की दरवाजाची आतील काडी सहज उघडणे सोपे जाते याबाबत चोरांचे चांगलेच निरीक्षण असण्याची शक्यता आहे.परिणामी त्यांनी काल मध्यरात्री संधी साधत देवळीतून दरवाजाची कडी उघडून आपली दिवाळी साजरी केली असल्याचे उघड झाले आहे.त्यात त्यांनी 55 हजार रुपयांचे 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण,एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या,सोन्याची एक 02 ग्रॅम वजनाची सोन्याची नथ,सोन्याचे 11 मणी,05 हजार 300 रुपयांची रोख रक्कम असा जवळपास 60 हजार 500 रुपयांचा पोबारा केला आहे.मात्र जाताना त्यांनी घर मालकावर कृपा केली असून दुचाकी घेऊन जाण्याऐवजी तिची चावी घेऊन गेले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे घर मालकाने चोरट्यांना एक प्रकारे ढिलेपण आणि आव्हान देऊन नाक खाजवून दाखवले असल्याचे मानले जात आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.व घटनास्थळी श्वान पथक पाचारण केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंद क्रमांक 138/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4),305(न) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल आर.ओ.खारखेले हे करत आहेत.



